खेड(प्रतिनिधी )- तालुक्यातील सवणस येथील एका महिलेचा खून करून पसार झालेल्या दोन संशयित आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना तब्बल २० वर्षांनी यश आले आहे. जहूर अब्दुल रज्जाक सुर्वे आणि गुफरान अब्दुल रज्जाक सुर्वे अशी दोघांची नावे असून त्यांना बुधवारी पनवेल येथे सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. दोघेही ठिकठिकाणी नावे बदलून वास्तव्य करत होते. या दोघांनी आर्थिक वादातून सवणस येथील अबिदा मियाँसाहेब सुर्वे. या महिलेचा २००६ मध्ये खून केला होता. खुनानंतर दोघांनीही पोबारा केला होता, सर्वत्र शोध घेऊनही पोलिसांना त्यांचा ठावठिकाणा लागला नव्हता. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. जी. महामुनी, पोलीस उपविभागीय अधिकारी शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक अहिरे आणि पथकाने दोघांनाही शिताफीने जेरबंद केले. दोघेही मुंबई आणि पनवेल येथे नावे बदलून वास्तव्य करत होते.
पोलिसांना याबाबत गोपनीय माहिती मिळताच पनवेल येथे सापळा रचण्यात आला, या सापळ्यात महिलेचा खून केल्याची कबुलीही दोघांनी दिली. पोलीस पथकात पोलीस येवले, उपनिरीक्षक श्रीकृष्ण रोहिदास केंद्रे, पोलीस कॉन्स्टेबल विकास पवार, वैभव ओहोळ, अजय कडू, सूरज मोरे यांचा समावेश होता. तब्बल २० वर्षांनी पोलिसांनी मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळत खून प्रकरणाचा छडा लावण्याची कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.








































































































































































































































.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.