loader
Breaking News
Breaking News
Foto

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त ‘निष्पाप’ नाटकाचे आयोजन

पनवेल (प्रतिनिधी) - दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे एक विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत मुंबई मराठी पत्रकार संघ प्रस्तृत ‘निष्पाप’ या नाटकाचे विनामूल्य सादरीकरण करण्यात येणार आहे. हा प्रयोग येत्या शनिवारी दिनांक २१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता पनवेल येथील आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडणार आहे. या निमित्ताने रसिकांना दर्जेदार नाट्यप्रयोग पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चोवीस तास बातम्यांच्या जगात वावरणाऱ्या पत्रकारांच्या संवेदनशीलता आणि सर्जनशीलतेला रंगभूमीवर योग्य व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने मुंबई मराठी पत्रकार संघाने पहिल्यांदाच ६४ व्या राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग नोंदवला असून पदार्पणातच दोन पुरस्कार पटकावण्याचा मान मिळवला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण निर्मित या नाटकासाठी लेखक प्रा. दिलीप परदेशी यांचे प्रभावी लेखन आणि दिग्दर्शक गुरुदत्त लाड यांचे कसदार दिग्दर्शन लाभले आहे. ‘निष्पाप’ हे नाटक पत्रकारांच्या अभिनयकौशल्याला नवी दिशा देणारे ठरत आहे.

टाईम्स स्पेशल

या नाटकात ज्येष्ठ पत्रकार देवदास मटाले आणि स्वाती घोसाळकर प्रमुख भूमिकेत आहेत. तसेच दिग्दर्शक गुरुदत्त लाड यांच्यासह प्रशांत चिडे, रश्मी महांबरे, सिद्धेश शिगवण आणि सुरेश ठुकरुळ यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. हा नाट्यप्रयोग सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, पनवेल आणि परिसरातील नाट्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg