loader
Breaking News
Breaking News
Foto

गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!!!

रत्नागिरी - आज गुढीपाडवा, मराठी नववर्षाचा पहिला दिवस! चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा सण साजरा केला जातो. गुढी पाडवा आणि हिंदू नवीन वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरात शोभा यात्रा निघाल्या. त्याचबरोबर महिलांच्या बाईक रॅली, ढोल-ताशांचे स्वर यामुळे सर्व वातावरणात एक वेगळाच जोश व उत्साह संचारला आहे. या शोभा यात्रांच्या माध्यमातून हिंदू संस्कृतीच प्रदर्शन करुन विविध सामाजिक विषय मांडले जातात. आजचा दिवस हा खास चैत्रातील आंबा नैवेद्याला ठेवायचा दिवस. आजपासूनच कोकणच्या हापूसच्या विक्रीला जोर येणार.. असं जुन्या जाणत्यांकडून सांगितले जाते. प्रत्येक घराच्या दारात आज गुढी उभारण्यात आली आहे. ही गुढी म्हणजेच समृद्धीतेचं प्रतिक आहे. गुढीला वापरण्यात येणारी वेळू (बांबू)ची काठी हे प्रगतीचं प्रतिक आहे तर त्याच्यावर ठेवण्यात आलेला तांब्याचा गढू, रेशमी वस्त्र हे भरभराटीचं प्रतिक आहे. नात्यांमधील गोडवा टिकावा यासाठी गुढीला साखरमाळा लावण्यात येतात. सोबतच कडूनिंबाचा पालासुद्धा गुढीसोबत लावण्यात येतो. आयुष्यातील कडू आठवणी कायम लक्षात रहाव्यात आणि त्यातून मार्ग काढत पुढे जाण्याची शिकवण मिळावी, यासाठी हा कडूनिंबाचा पाला आवर्जून गुढीला लावला जातो. यामागे आरोग्यदायी नवीन वर्षाची सुरुवात व्हावी, असाही हेतू आहे. आंब्याचा डहाळी, फुलांची माळ हे मांगल्याचे प्रतिक आहे. घराघरात समृद्धता वाढावी आणि नवीन वर्ष प्रत्येकाला सुखासमाधानाचे आणि आनंदाचे जावे, यासाठी आज गुढी उभारण्यात येते. टाइम्स परिवारातर्फे सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!!!

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg