मालवण (प्रतिनिधी) - ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे (फेस्कॉन संलग्न) यांचा जीवनगौरव पुरस्कार २०२६ ज्ञानदीप विद्यामंदिर वांयंगणी या प्रशालेचे माजी मुख्याध्यापक आणि ज्ञानदीप वाचनालय वांयंगणीचे अध्यक्ष प्रकाश किरात पेडणेकर (मु.पो. वांयंगणी, तालुका -मालवण ) यांना जाहीर झाला असून त्याचे वितरण मंगळवार दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी ऐश्वर्य रिसाॅर्ट पिरावाडी आचरे या ठिकाणी संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी यांच्या शुभहस्ते होणार आहे. शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ ,सन्मानपत्र व सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून प्रतिवर्षी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या मेळाव्यात या पुरस्काराचे वितरण केले जाते अशी माहिती ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे कार्यवाह जकारिएस फर्नांडिस यांनी दिली.
या मेळाव्यात कणकवलीचे प्रा. सोमनाथ कदम यांचे ज्येष्ठांसाठी मार्गदर्शन होणार असून त्यावेळी जेष्ठ नागरिकांचे योगप्रदर्शनाही होणार आहे. त्याचवेळी ज्येष्ठ नागरिक महिला विभागाचा 'आमच्या वेळच्या कविता 'हा कार्यक्रम सादर होणार आहे. प्रकाश किरात पेडणेकर यांनी शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात आचरे पंचक्रोशीत गेले अर्धशतक बहुमोल सेवा केलेली आहे आणि शैक्षणिक संस्थांना, अनेक गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे हे आपले व्रत समजून समाजसेवा केली आहे .या सर्वांचा विचार करून त्यांना यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. प्रकाश किरात पेडणेकर हे ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरेचे आजीव व क्रियाशील सदस्य असून ते को.म.सा.प .शाखा मालवण, अ.भा. साने गुरुजी कथामाला शाखा मालवणचे आजीव सदस्य आहेत. त्यांचा विद्यार्थी वर्ग कोकण व मुंबई विभागात पसरलेला आहे या पुरस्कारासाठी त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.






































































































































































































































.jpg)




.jpg)









































































































































.jpg)


























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.