मुंबई. राज्यातील रुग्णांसाठी मोठा दिलासा देणारी घोषणा राज्य सरकारने केली आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत सांगितले की, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत या योजनांअंतर्गत बायपाससह विविध मोठ्या शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. सोमवारी झालेल्या विधानसभेच्या कामकाजादरम्यान ही माहिती देताना त्यांनी स्पष्ट केले की, या योजनांतर्गत पात्र रुग्णांना आवश्यक त्या सर्व शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत दिल्या जातील. तसेच योजनांचे नियम पाळत नसलेल्या किंवा रुग्णांकडून अतिरिक्त पैसे उकळणाऱ्या रुग्णालयांवर तात्काळ कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, या योजनांच्या अंमलबजावणीवर अनेक आमदारानी प्रश्न उपस्थित करत सभागृहात एका शेतकऱ्याचा मुद्दा मांडला. महाराष्ट्रातील विठ्ठल कदम या शेतकऱ्याला बायपास शस्त्रक्रिया करावी लागणार असून त्यासाठी सुमारे ११ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
नियमानुसार या योजनांमधून रुग्णाला केंद्र सरकारकडून तीन लाख आणि राज्य सरकारकडून तीन लाख असे एकूण सहा लाख रुपये मिळणे अपेक्षित आहे. मात्र संबंधित रुग्णालयाने केवळ एक लाख रुपयांची मदत मंजूर होईल, असे सांगितल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून शस्त्रक्रिया रखडली असल्याची माहिती समोर आली आहे. योजनेत सहा लाख रुपयांची तरतूद असताना केवळ एक लाख रुपयेच मंजूर का केले जात आहेत, असा थेट सवाल आमदाराने सभागृहात उपस्थित केला. यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या तक्रारी गंभीर असून योजनेचा गैरवापर किंवा नियमभंग करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई केली जाईल. सरकारच्या या घोषणेमुळे राज्यातील गरीब व गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून महागड्या बायपाससारख्या शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

















































































































































































































.jpg)




.jpg)





























































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.