ठाणे (प्रतिनिधी) - डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या सुचनेनुसार तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या शिफारशीवरून राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या ठाणे महानगर पालिकेतील गटनेतेपदी नगरसेवक अभिजीत पवार यांची निवड करण्यात आली आहे.
ठाणे महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर अश्रफ शानू पठाण यांची ठाणे महानगर पालिकेत गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या महासभेत शानू पठाण यांची विरोधी पक्ष नेतेपदी निवड केल्याने रिक्त झालेल्या गटनेतेपदावर अभिजीत पवार यांची निवड करण्यात आली आहे. अभिजीत पवार हे प्रभाग क्रमांक 9 मधून विजयी झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे तथा डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे.
या निवडीनंतर बोलताना, "डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशाने तसेच मनोज प्रधान यांच्या शिफारशीनुसार आपली गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाची सर्वसमावेशक भूमिका मांडण्यास आपण प्राधान्य देणार असून पक्षाच्या नगरसेवकांना एकसंघ ठेवण्यासाठी आपण काम करणार आहोत, असे अभिजीत पवार यांनी सांगितले.
















































































































































































































.jpg)




.jpg)



























































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.