loader
Breaking News
Breaking News
Foto

राजापूरच्या हुस्नबानू खलिफे, लांजाच्या पूर्वा मुळे आणि देवरुखच्या सबुरी थरवळ या रणरागिणी विजयी होणार : रविंद्र माने, नेहा माने

देवरुख (सुरेश सप्रे) - ‘‘महाविकास आघाडीचे देवरुख, लांजा व राजापूर या तीनही ठिकाणी कर्तबगार, सुसंस्कृत व जनहित दक्ष असे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. देवरुखच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सबुरी थरवळ, लांजा, कुवेच्या नगराध्यख पदाच्या उमेदवार पूर्वा मुळे व राजापूरच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार हुस्नबानू खलिफे या तीनही रणरागिणी विलक्षण त्वेषाने व जोशाने निवडणूक लढवित आहेत. तसेच या तीनही न.प.मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सर्व प्रभागांमध्ये निवडणुकीला उभे आहेत. देवरुख, लांजा व राजापूर येथील सूज्ञ मतदार बंधु भगिनींनी या तीनही रणरागिणींना भरभरुन मते देऊन घवघवीत मताधिक्क्याने विजयी करावे’’ असे जोशपूर्ण आवाहन भूतपूर्व मंत्री रविंद्र माने व धडाडीच्या महिला नेत्या नेहा रविंद्र माने यांनी केले आहे. न.प. निवडणुकींच्या पार्श्‍वभूमीवर रविंद्र माने व नेहा माने यांची दै. ‘रत्नागिरी टाइम्स’साठी मुलाखत घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रविंद्र माने यांनी शिवसेना, भाजपा युतीच्या काळात महाराष्ट्राचे अर्थराज्यमंत्री पद भुषविले आहे. ते कोकणातील एक सचोटीचे व कर्तबगार नेते म्हणून सुपरिचित आहेत. त्यांच्या सौभाग्यवती नेहा रविंद्र माने या देखील जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक कार्यात आघाडीवर असतात. त्यांनी सांगितले की, ‘‘राजापूर, लांजा व देवरुख या तीनही ठिकाणी महाविकास आघाडी अभेद्य आहे. येथील महाविकास आघाडीचे सर्व नेते व पदाधिकारी अतिशय संयमी व समंजस असल्याने एकजुट अभंग राहिली. या तीनही ठिकाणी महाविकास आघाडीचे सुरुवातीपासून वर्चस्व राहिले आहे’’ असे त्यांनी नमूद केले. रविंद्र माने व नेहा माने या दोघांची संयुक्त मुलाखत घेण्यात आली. त्यांनी सांगितले, ‘‘महाविकास आघाडीच्या देवरुखमध्ये सौ. सबुरी थरवळ या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. लांजा, कुवे न. प. मध्ये सौ. पूर्वा मुळे या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत तर राजापूर न. प. मध्ये हुस्नबानू खलिफे या आमच्या ‘कर्तबगार’ उमेदवार आहेत. या तीनही रणरागिनी मजबुतीने निवडणूकीच्या रणांगणात उतरल्या असून सुरुवातीपासून त्या प्रचारात आघाडीवर आहेत. या तीनही न.प.मध्ये महाविकास आघाडीने सर्व प्रभागातील जागांवर देखील तरुण, तत्पर व सचोटीचे उमेदवार दिले आहेत’’ असे त्यांनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

रविंद्र माने व नेहा माने हे कोकणातील कर्तबगार नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या विषयी सर्वत्र मोठा आदरभाव वसत आला आहे. त्यांनी सांगितले, ‘‘राजापूर, लांजा व देवरुख या तीनही न. प. मधील महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुसंस्कृत, सोज्वळ, विनयशील, कर्तबगार, कर्तव्यतत्पर तसेच जनहितासाठी तळमळीने कार्य करणारे असे आहेत. या तीनही उमेदवारांनी जनतेच्या हिताची कामे करुन जनतेचा विश्‍वास संपादन केला आहे.. या तीनही रणरागिणी कर्तबगारी सिध्द करुन दाखविलेल्या नेत्या आहेत. त्यांना सर्व नागरिकांनी एकजुटीने मतदान करुन भक्कम मतांनी विजयी करावे’’ असे त्यांनी विनम्र आवाहन केले. रविंद्र माने व नेहा माने उत्साहाने बोलत होते. त्यांनी सांगितले, ‘‘राजापूर, लांजा व देवरुख या तीनही न.प.चे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जसे कर्तबगारी सिध्द केलेले उमेदवार आहेत तसेच या तीनही ठिकाणच्या न.प.च्या सर्व प्रभागातील महाविकास आघाडीचे उमेदवार हे देखील तरुण, तडफदार, विनम्र व जनहित दक्ष असे आहेत. महाविकास आघाडीचे या तीनही न. प. मध्ये सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार उभे आहेत. राजापूर, लांजा व देवरुख येथील सूज्ञ मतदार बंधु भगिनींनी या सर्वांना मोठ्या बहुमताने विजयी करावे आणि विकासाचा मार्ग खुला करावा’’ असे भावनिक आवाहन श्री. रविंद्र माने व सौ. नेहा माने यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg