loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूणचे जाणते राजे रमेशभाई कदम यांची प्रचारामध्ये जोरदार मुसंडी

चिपळूण (वार्ताहर) :- चिपळूणचे जाणते राजे म्हणून ज्यांना चिपळूणकर प्रेमाने साद घालतात असे माजी आमदार रमेशभाई कदम यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यापासून प्रचारात मुसंडी मारली आहे. चिपळूणमधील सर्व स्तरातील आणि सर्व वयोगटातील मतदार त्यांना पाठिंबा देत असून विविध सामाजिक संस्था आणि युवक मंडळांनी त्यांना एकमुखी पाठिंबा जाहीर केला आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात रमेशभाईंना मिळालेला प्रतिसाद हा त्यांचा विजय मानला जात आहे. रमेशभाई कदम हे जवळपास गेली ३०-४० वर्षे राजकीय क्षेत्रात धडाडीने कार्य करत आहेत. चिपळूणचे नगराध्यक्ष पद त्यांनी भूषविले आहे. चिपळुणातील अनेक विकास कामांना त्यांनी चालना दिली आहे. पाणी योजना असो किंवा रस्ते असोत, गटारे असोत किंवा प्रभागातील अनेक सुविधा असोत, रमेशभाईंनी या प्रत्येक प्रश्‍नाला न्याय दिला आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे आणि तो त्यांना विजयापर्यंत घेऊन जाईल असा विश्‍वास अनेकांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चिपळूणकर जनतेच्या आग्रहाखातर माजी आमदार रमेशभाई कदम नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. पहिल्या दिवसापासूनच त्यांच्या प्रचाराला चिपळूणकरांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. चिपळूणचे जाणते राजे रमेशभाई कदम हे पुन्हा नगराध्यक्ष व्हावेत अशी इच्छा अनेकांनी जाहीरपणे बोलून दाखविली आहे. रमेशभाई कदम हे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले तरी त्यांना अन्य पक्षांच्या नेते मंडळींनी देखील समर्थन दिले आहे. अनेक युवक उत्स्फूर्तपणे त्यांच्या प्रचारात सामील झाले आहेत. प्रचारात मिळत असलेला पाठिंबा हा कार्यकर्त्यांचा हुरुप वाढविणारा असून रमेशभाई मोठ्या मताधिक्याने पुन्हा एकदा चिपळूणच्या नगराध्यक्षपदी विराजमान व्हावेत यासाठी चिपळुणातील त्यांचे चाहते स्वत:हून पुढे आले असून त्यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg