loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड न. प. वर महायुतीचा भगवा फडकणार : ना.कदम

खेड (वार्ताहर) :- खेडमध्ये शिवसेना-भाजप महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माधवी बुटाला आणि नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार प्रचारात आघाडीवर असून खेडमधील नागरिकांकडून महायुतीच्या उमेदवारांना मिळत असलेला भरभरुन प्रतिसाद पाहता खेड नगरपरिषदेवर पुन्हा एकदा महायुतीचा भगवा झेंडा फडकेल असा विश्‍वास गृहराज्य मंत्री ना. योगेश कदम यांनी व्यक्त केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खेडमध्ये महायुती भक्कमपणे उभी असून एकजुटीने प्रचारात सहभागी झाली आहे. खेडच्या जनेतचा विश्‍वास महायुतीला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल असे महायुतीच्या अनेक नेत्यांनी सांगितले. ज्येष्ठ नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना- भाजप महायुतीचे सर्व नेते आणि पदाधिकारी प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. महायुतीच्या उमेदवारांना प्रत्येक प्रभागात मिळत असलेला पाठिंबा आणि प्रचाराचा झंझावात पाहता महायुतीचा भगवा खेड न. प. वर पुन्हा एकदा दिमाखात फडकेल असा विश्‍वास गृहराज्य मंत्री ना. योगेश कदम यांनी व्यक्त केला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg