loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी नगराध्यक्ष पदाच्या महायुतीच्या उमेदवार शिल्पाताई सुर्वे २५ हजारांच्या भक्कम मताधिक्क्याने विजयी होणार : ना. उदय सामंत

रत्नागिरी (प्रतिनिधी) - ‘‘रत्नागिरी हे माझे ‘घर’ आहे आणि मी पालकमंत्री असल्याने रत्नागिरी जिल्हा हा देखील मी माझा मानतो! रत्नागिरीत शिवसेना, भाजप व मित्र पक्षांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पाताई सुर्वे आहेत.. त्या २५ हजारांच्या भरभक्कम मताधिक्क्याने विजयी होतील तसेच रत्नागिरी न.प. प्रभागातील आमचे सर्वच्या सर्व ३२ शिलेदार बहुमताने विजयी होतील. एवढेच नव्हे तर शिवसेना, भाजपा महायुतीचे जिल्ह्यातील सर्व सातही न.प. चे नगराध्यक्ष व प्रभागातील उमेदवार विजयी होतील’’ असा दमदार आत्मविश्‍वास पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी निवडणुकीच्या पूर्वसंध्येला व्यक्त केला. ना. उदय सामंत हे ‘कोकणचे भाग्यविधाते’ म्हणून ओळखले जातात. त्यांचे सतत दोरे सुरु असतानाही त्यांनी मुलाखतीसाठी दै. रत्नागिरी टाइम्स’ला वेळ दिला. उदय सामंत भरभरुन बोलत होते. त्यांनी सांगितले, ‘‘राज्यातील मंडळी रत्नागिरीचा उल्लेख ‘प्रति सिंगापूर’ असा करतात.. माझी ही रत्नागिरी नगरी खरोखरच ‘प्रति सिंगापूर’ करण्याचा आम्ही ध्यास घेतला आहे.. याच आपुलकीच्या भावनेने आम्ही रत्नागिरीसाठी ‘स्मार्ट सिटी’चा महत्वाकांक्षी प्रकल्प मंजुर करुन आणला.. एवढेच नव्हे तर त्यासाठी सुरुवातीचा निधी म्हणून रु. ५०० कोटींचा निधी मंजुर करुन घेतला. आता काही दिवसातच लोक प्रतिनिधी न. प. मध्ये सत्तेवर येतील आणि मग ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाला वेग प्राप्त होईल’’ असे त्यांनी स्पष्ट केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उदय सामंत यांच्या मनात रत्नागिरी शहराबद्दल फार मोठी आपुकीची भावना वसत आली आहे, त्यांच्या बोलण्यातून क्षणोक्षणी ते जाणवते. त्यांनी सांगितले, ‘‘रत्नागिरीकरांनी मला सदैव भरभरुन प्रेम दिले.. त्यांनी विश्‍वासाने मला एकदा, दोनदा नव्हे तर सलग ५ वेळा मोठ्या मताधिक्क्याने विजयी केले.. रत्नागिरीकरांचे पाठबळ पाठीशी असल्याने मला मोठ्या पदांवर काम करण्याची संधी लाभली.. रत्नागिरीकरांचे हे ऋण मी कदापि विसरणार नाही आणि रत्नागिरी नगरी ‘प्रति सिंगापूर’ केल्याशिवाय राहणार नाही’’ अशा भावविभोर शब्दात त्यांनी मनोभावना व्यक्त केली. ना. उदय सामंत विलक्षण उत्साहाने बोलत होते. त्यांनी सांगितले, ‘‘माझ्या रत्नागिरीच्या नगराध्यक्ष पदासाठी शिल्पाताई सुर्वे या उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्या कुणाच्या नातेवाईक आहेत म्हणून नव्हे तर त्या सर्व रत्नागिरीकरांच्या एकमुखी पसंतीच्या उमेदवार म्हणून त्यांना महायुतीने उमेदवारी बहाल केली. तसेच रत्नागिरीतील सर्वच्या सर्व ३२ जागी नगरसेवक पदासाठी महायुतीचे शिलेदार या निवडणुकीला उतरले आहेत. ते सारेजण तरुण, तडफदार, विनयशील, कर्तव्यतत्पर व जनतेसाठी तळमळीने काम करणारे असे आहेत. म्हणूनच त्या सर्वांना रत्नागिरीकरांचा मजबुत पाठींबा लाभला आहे’’ अशा शब्दात त्यांनी सारी वस्तुस्थिती स्पष्ट केली.

टाइम्स स्पेशल

ना. उदय सामंत अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्यांनी सांगितले, ‘‘रत्नागिरीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पाताई सुर्वे या २५ हजारांच्या दणदणीत मताधिक्क्याने विजयी होतील तसेच शिवसेना, भाजपा महायुतीचे प्रभागातील सर्वच्या सर्व ३२ उमेदवार हे मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील. शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व भाजपाचे प्रांताध्यक्ष मा. रविंद्र चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन या सर्वांना लाभले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे आमचे सर्व उमेदवार भक्कम मताधिक्क्याने विजयी होतील आणि रत्नागिरी नगरीचा विकास वेगाने सुरु होईल’’ असा सार्थ विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg