दापोली (शशिकांत राऊत) - सर्वसाधारणपणे संकष्टी चतुर्थी, विनायकी चतुर्थी किंवा अंगारकी चतुर्थीच्या दिवशी श्री गणपती मंदिरात भक्तगण भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते मात्र आज रविवारी संकष्टी चतुर्थी नव्हती वा नव्हती विनायकी चतुर्थी किंवा अंगारकी चतुर्थीचा नव्हता योग तरी सुद्धा आंजर्ले येथील सुप्रसिध्द कडयावरील गणपती मंदिरात श्रीं च्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. दापोली हे उत्तर कोकणातील महाबळेश्वर, अर्थात थंड हवेचे ठिकाण म्हणूनच दापोलीची ओळख आहे. अशा या तालूक्यात आंजर्ले नावाचे एक महसुली गाव कडयावरील श्रीं गणपती देवस्थानसाठी सुप्रसिद्ध असे ठिकाण आहे. आंजर्ले या गावाचे मूळ नाव पूर्वी अजरालय असे होते. सध्या मात्र आंजर्ले हेच नाव प्रचलित झाले आहे. त्याच आंजर्ल्याच्या एका टेकडीवर श्री गणपती विराजमान आहेत. त्याला सारे जण कड्यावरचा गणपती असेही म्हणतात. या कड्यावरच्या गणपतीची आख्यायिका अशी सांगितली जाते की, आंजर्ले येथील समुद्रकिनारा अवाढव्य व विस्तिर्ण होता. किनाऱ्यावर दोन मंदिरे होती. एक श्री सिद्धिविनायकाचे आणि दुसरे आंजर्लेश्वर, म्हणजे शंभू महादेवाचे. कालांतराने समुद्राची वाढ झाली तशी मंदिरे पाण्याखाली जाऊ लागली. मंदिरे समुद्रात जाताच श्री सिद्धिविनायकाने किनाऱ्यासमोरच्या कड्यावर जाऊन आपला मुक्काम केला, एका कातळावर उमटलेले पाऊल हे श्री सिद्धिविनायकाचे असून समुद्रातून वर येताना हे पाऊल उमटलेले आहे, असा श्री गणेशभक्तांचा विश्वास आहे. त्यानंतर एका गणेशभक्ताने श्री सिद्धिविनायकाची स्थापना कड्यावर केली. गणपती मंदिराचा इतिहास बाराव्या शतकापर्यंत मागे जात असल्याचे सांगितले जाते.
अशा या श्री कडयावरील गणपती मंदिरातील श्री गणेशाच्या मूर्तीचे वर्णन शब्दांत करणे तसे कठीणच जाते. श्री गजाननाचे दर्शन घेतल्यानंतर आपल्याला लाभणारी प्रसन्नता आणि शांती या दोन्ही गोष्टी केवळ अनुभवावयच्याच आहेत. गाभाऱ्यातील श्रींच्या मूर्तीवर विलक्षण तेज आढळते. पाच फूट उंचीची मूर्ती पूर्वाभिमुख असून शेजारील रिद्धि सिद्धिच्या मूर्ती सुमारे एक फूट उंचीच्या आहेत. हे मंदीर टेकडीवर असल्याकारणाने आपण दर्शनासाठी टेकडीवर येताच ते आपल्या दृष्टीस पडते. श्रीसिद्धिविनायकाचे मंदिर अर्थात कड्यावरचा गणपती अनेक भक्तांचे श्रद्धास्थान आहे. अशा या आंजर्ले येथील कडयावरील गणपती मंदिरात तसे कायमच भक्त गण हे दर्शनासाठी येत असले तरी विशेषतः संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी निमित्ताने खुपच मोठी दर्शनासाठी गर्दी होत असते तसे आज संकष्टी चतुर्थी नव्हती ना विनायकी वा नव्हती अंगारकी चतुर्थी तरी सुद्धा कोकण पर्यटनासाठी दापोलीत आलेल्या पर्यटकांनी कडयावरील श्रीं गणपती देवस्थानच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मागील चार दिवसांपासूनच दापोली तालुक्यातील केळशी ते दाभोळ पर्यंतच्या किनारपट्टीवर मोठ्या संख्येने पर्यटक भटकंतीसाठी दाखल झाले आहेत. येथे आलेले पर्यटक हे केळशी येथील श्रीमहालक्ष्मी मंदिरात, केळशी उंटबर येथील याकुबबाबा दर्गा, आडे येथील भार्गवराम मंदिर, दाभोळ येथील भुयारातील श्रीचंडिका देवी, मुरुड येथील दुर्गा माता आदी विविध ठिकाणच्या देवतांच्या मंदिरात देव दर्शन घेत आहेत. तसे पन्हाळेकाजीची लेणी, उन्हवरे येथील गरम पाण्याचे कुंड, तामसतीर्थचा तांबडा समुद्र, हर्णे येथील पाण्यातील सुवर्णदुर्ग किल्ल, गोवा किल्ला, आसुद येथील केशवराव ठिकाणांना भेटी देत आहेत. त्यात प्रामुख्याने आंजर्ले येथील कडयावरील गणपती मंदिराला आवर्जून भेट देत श्रीं चे दर्शन घेत आहेत.
असे हे कड्यावरील गणपती देवस्थान निसर्गाच्या कोंदणात लपलेले असे हे सर्वांच्याच श्रध्देचे ठिकाण आहे. येथून हर्णे येथील सुवर्णदुर्ग किल्ल्याकडे तोंड करून उभे राहीलो तर समुद्र दर्शन तर होतेच शिवाय आंजर्ले गावातील सुपारी नारळी केळीच्या बागांचा सृष्टी सौंदर्याचा मनोहारी नजारा आपल्याला डोळ्यात साठवता येतो. दापोली तालुक्यातील समुद्र किनारपट्टीवर भटकंती करिता आलेले पर्यटक हेआंजर्ले येथील कडयावरील गणपतींचे देव दर्शन ही घेत आहेत. त्यामुळे येथे दर्शनासाठी मोठीच गर्दी होत आहे. कड्यावरील श्री गणपती देवस्थान, आंजर्ले यांनी उत्तम व्यवस्था ठेवल्याने दर्शनासाठी येथे आलेल्या सर्व भाविक भक्तगणांना अगदी मनोभावे दर्शन घेता येते. हे या देवस्थान कमिटीच्या व्यवस्थापनाचे आणि येथील कर्मचारी सेवेक-यांचे खरे यश म्हणावे लागेल.





































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.