loader
Breaking News
Breaking News
Foto

एकनाथ शिंदेंचा भाजपाला सर्वात मोठा दणका, अजितदादांना सोबत घेऊन थेट युतीची घोषणा; मोठी खळबळ!

महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. युती आणि आघाड्यांच्या राजकारणाने जोर धरला आहे. स्थानिक पातळीवरील राजकारण लक्षात घेऊन युती केली जात आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी युतीमध्ये भाजपाला बाहेर ठेवले जात आहे. तर काही ठिकाणी शिंदे गट आणि अजित पवार यांना बाहेर ठेवून युती जन्माला येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. येथे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा यांच्यात युती करण्यासाठी चर्चा चालू होती. परंतु आता ऐनवेळी येथे मोठा ट्विस्ट आला आहे. सोलापुरात एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी या दोन पक्षांनी युती केली असून भाजपाला धक्का दिला आहे. या नव्या प्रयोगामुळे आता सोलापुरातील विजयाचं गणित बदलणार आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर महापालिकेसाठी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र आले आहेत. या दोन्ही पक्षांत 51-51 जागांचा फॉर्म्युला ठरला आहे, याबाबत शिंदे गटाचे नेते सिद्धराम म्हेत्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नगरविकास खाते आणि अर्थखाते आमच्या पक्षांच्या नेत्यांकडे आहे. त्यामुळे आम्हाला निधीची कमतरता पडणार नाही. शहर विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे म्हेत्रे म्हणाले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg