loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूण तालुका काँग्रेसचा स्थापना दिन उत्साहात साजरा

चिपळूण तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवार, दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी काँग्रेस पक्षाचा स्थापना दिन गांधी घाट, गांधीश्वर मंदिर, मुराडपूर येथे उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष सोनललक्ष्मी घाग यांच्या नेतृत्वाखाली तसेच हुसैन दलवाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमात मनरेगा योजनेतील बदलांमुळे ग्रामीण व गरिब कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात जनजागृती करण्यात आली तसेच यासंदर्भात प्रखर आंदोलन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी इब्राहिम दलवाई, सुरेश राऊत, शफा गोटेस, सुरेश पाटरे, शिबीर डाबोरकर, तालुका अध्यक्ष प्रकाश साळवी, शहर अध्यक्ष कैसर देसाई खेडेकर, साजिद सरगुरू यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार यशस्वीरीत्या पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg