loader
Breaking News
Breaking News
Foto

पुष्पदत्त इंग्लिश मिडीयम स्कूलचे स्नेहसंमेलन संपन्न

रत्नागिरी : कै. रमेश अनंत साळवी प्रतिष्ठान, नाचणे संचलित पुष्पदत्त इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उदघाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश दफ्तरदार यांच्या हस्ते झाले तर सौ. स्नेहल संजय वैशंपायन यांनी दिप प्रज्वलन केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेला व नाट्यदेवता नटराज मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शाळेतील विद्यार्थीनीनी सुस्वागतम म्हणून उपस्थितांचे स्वागत केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. गोताड यांनी स्नेहसंमेलनाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे उदघाटक यांच्या हस्ते प्रशालेची इयत्ता दहावीची विद्यार्थीनी नुपुर दफ्तरदार हिचा पुष्प व बक्षिस देऊन गुणगौरव केला.

टाईम्स स्पेशल

सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात ‘गणेशवंदना’ या नृत्याने झाली. ‘पारंपारिक नृत्य कलाविष्कार’ या संकल्पनेवर आधारित विविध नृत्यांचे सादरीकरण केले. तसेच कराटे व जिम्नॅस्टिक डेमो तसेच कॉमेडी डान्स, गोंधळ नृत्य, आदिवासी नृत्य, अभिनय इ. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. ‘वंदे मातरम’ म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रेखा जाधव व विद्यार्थी यांनी केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन सौ. अन्वी सुर्वे यांनी केले. विद्यार्थी व शिक्षक यांना स्नेहभोजन देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg