loader
Breaking News
Breaking News
Foto

म्हसळा चेक पोस्ट येथे दिशादर्शक फलक लावण्याची मागणी

म्हसळा - रायगड : दिघी- पुणे राष्ट्रीय महामार्गावर असलेला म्हसळा चेक पोस्ट हा म्हसळा तालुका शहराचा प्रमुख नाका असून याठिकाणी माणगाव, श्रीवर्धन व गोरेगावकडे जाणारे महत्त्वाचे राज्य मार्ग एकत्र येतात. तसेच याच ठिकाणी म्हसळा पोलीस ठाण्याचा चेक पोस्ट कार्यान्वित आहे. मात्र, इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी आजतागायत दिशादर्शक फलक न लावण्यात आल्याने प्रवासी व पर्यटकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.एमएसआरडीसीमार्फत खाजगी रस्ते विकासकांनी रस्ता विकसित केला असला तरी, म्हसळा चेक पोस्ट येथे दिशादर्शक फलक नसल्यामुळे वाहनचालकांना योग्य मार्ग ठरवताना संभ्रम निर्माण होतो. या ठिकाणी मार्गदर्शक फलकासाठी खांब उभारण्यात आले असले तरी गेल्या दहा वर्षांपासून त्या खांबांवर मार्ग कुठे जातो याची माहिती देणाऱ्या पाट्या लावण्यात आलेल्या नाहीत.काँक्रिट रस्ता होऊन दशक उलटले तरी ही बाब दुर्लक्षित राहिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सध्याच्या काळात श्रीवर्धन, दिवेआगर,हरिहरेश्वर यांसारख्या पर्यटनस्थळांकडे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असल्याने रात्री अपरात्री परतीच्या प्रवासात अनेक वाहनचालक म्हसळा चेक पोस्ट येथे आल्यावर गोंधळात पडतात. दिशादर्शक फलक नसल्याने मुंबई–गोवा महामार्गावर नेमका कोणता मार्ग घ्यावा हे अचूकपणे समजत नाही.काही वेळा चेक पोस्टवर पोलीस कर्मचारी उपलब्ध नसल्याने वाहनचालकांची कुचंबना अधिक वाढते.या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष देऊन म्हसळा चेक पोस्ट येथे स्पष्ट व योग्य दिशादर्शक फलक बसवावेत, अशी मागणी म्हसळा येथील निवासी ग्रामस्थ व स्वयंसेवक प्रसाद जवळे यांनी केली आहे.दिशादर्शक फलक लावल्यास प्रवासी, पर्यटक तसेच स्थानिक नागरिकांची गैरसोय दूर होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg