loader
Breaking News
Breaking News
Foto

आम्ही सुडाचे राजकारण करणार नाही तर कणकवलीचा विकास साधणार

कणकवली (प्रतिनिधी)- ‘भयमुक्त कणकवली, भ्रष्टाचार मुक्त कणकवली’ हा आमचा नारा आहे. कणकवली नगरपंचायतीमध्ये आता सत्ता परिवर्तन अटळ आहे. मात्र या सत्ताधार्‍यांप्रमाणे आम्ही सुडाचे राजकारण करणार नाही. आम्ही कोणताही भेदभाव करणार नाही. कारण हे शहर सर्वांचेच असून येथे लोकशाही प्रस्थापित केली जाईल. ही लोकशाही निर्माण करण्यासाठी नागरिकांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावावा. मी दहा वर्षे सरपंच आणि पाच वर्षे नगराध्यक्ष म्हणून केलेला विकासात्मक कारभार जनतेसमोर आहे. ही माझी नगरपंचायतीची शेवटची निवडणूक आहे. त्यामुळे जनता मला निश्चितपणे संधी देणार आहे.आम्ही ही निवडणूक शांत, सुंदर, विकासाकडे वाटचाल करणारी कणकवली बनविण्यासाठी लढवत आहोत, असे शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर म्हणाले. कणकवली येथील आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर बोलत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संदेश पारकर म्हणाले, मागील काही दिवसांमध्ये शहरातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला. प्रचार बैठका, प्रचार फेरीच्या माध्यमातून मतदारांना भेटलो. मतदारांमधूनच परिवर्तनाचा आवाज व्यक्त होत आहे. त्यामुळे कणकवलीत नक्कीच सत्ता बदल होऊन शहर विकास आघाडीची सत्ता येणार आहे. मात्र सत्ता आल्यानंतर देखील आम्ही सुडाचे राजकारण कधीही करणार नाही. राजकारण निवडणुकीपुरतेच असते, त्यानंतर शहरातील सगळी जनता माझीच असणार आहे. आठ वर्षांपूर्वी गतवेळच्या सत्ताधार्‍यांनी कणकवली शहरात घनकचरा विषयक एजी डॉक्टर्स हा ९०० कोटींचा प्रकल्प आणणार असल्याची घोषणा केली. त्यासाठी नगरपंचायतीची तीन एकर जमीन गहाण ठेवण्यात आली. मग तो प्रकल्प गेला कुठे? सत्ता येईल तेव्हा सदरची तीन एकर जमीन नगरपंचायतीच्या ताब्यात घेणार असल्याचेही पारकर यांनी सांगितले. कणकवली शहरात मागील आठ वर्षात ४०० कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. या सर्व कामांचा एकच ठेकेदार असून सत्ताधारी हे त्याचे पार्टनर आहेत. सत्ताबदल होईल तेव्हा या ठेकेदाराची व त्याच्या निकृष्ट कामांचीही चौकशी करणार असल्याचा इशारा पारकर यांनी दिला.

टाइम्स स्पेशल

कणकवलीत एका प्रसाधनगृहासाठी ४०० स्क्वेअर फुट एवढ्या जागेत प्रसाधनगृह उभारण्यात आले. त्यासाठी तब्बल ८६ लाख रुपये एवढा खर्च झाला. यात किती भ्रष्टाचार झाला असेल याची कल्पना करा असे संदेश पारकर म्हणाले. ही माझी नगरपंचायतीची शेवटची निवडणूक असल्याचा पुनरुच्चार संदेश पारकर यांनी केला. १० वर्षे सरपंच, कणकवलीचा प्रथम नगराध्यक्ष या १५ वर्षाच्या कारकीर्दीत मी केलेल्या विकास कामांविषयी शहरवासीय आजही बोलून दाखवतात. माझ्या कार्यकाळात होता, तसाच नावलौकिक कणकवली शहराला प्राप्त व्हावा, अशी जनतेची इच्छा आहे. कारण कणकवली हे व्यापार, राजकारण अध्यात्मिक यांचे केंद्र आहे, असेही संदेश पारकर म्हणाले. आमच्या विरोधकांकडून आश्वासनांची खैरात सुरू आहे.सिद्धार्थनगर, तेलीआळी व काही दलित वस्त्यांमध्ये फिरत असताना झोपडपट्‌ट्यांमध्ये राहणारे जे लोक आहेत, त्यांना अद्याप घरी मिळाली नसल्याचे लक्षात आले. याच लोकांना नगरपंचायतीच्या आरक्षित जमिनी् देऊन घरेही उपलब्ध करून देऊ, असा शब्द मागील वेळेच्या सत्ताधार्‍यांनी दिला होता. मात्र एकही घर मिळालेले नाही आमची सत्ता येईल त्यावेळी या सर्व लोकांच्या जीवनामध्ये स्थैर्य आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, असेही पारकर म्हणाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg