loader
Breaking News
Breaking News
Foto

कोतेवाडा येथील श्रीपाद पंतवालावलकर यांचे निधन

मालवण (प्रतिनिधी) : शहरातील कोतेवाडा येथील रहिवासी तसेच कृ. सी. दे. शिक्षण मंडळाचे माजी कार्याध्यक्ष श्रीपाद शंकर तथा बाळासाहेब पंतवालावलकर (वय ८४) यांचे मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने मालवण परिसरातील शैक्षणिक, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे ‘शंकरसागर’ हे निवासस्थान कोतेवाडा, चिवलाबीच नजीक येथे होते. बाळासाहेब पंतवालावलकर यांनी तब्बल १२ वर्षे कृ. सी. दे. शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष म्हणून यशस्वीपणे काम पाहिले. ते श्री शिवाजी वाचन मंदिर, भरड मालवणचे माजी विश्वस्त, मौनीनाथ मंदिरचे माजी सल्लागार होते. तसेच अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थांवर त्यांनी विविध पदांवर काम केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शासनाच्या रेशनिंग विभागात त्यांनी उच्च अधिकारपदावर सेवा बजावली. माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांच्या कार्यकाळात त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. कोल्हापूर येथील वालावलकर संस्थेच्या रुग्णालयाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कार्य केले. मुणगे येथील वालावलकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. मालवणमधील शिक्षण क्षेत्राच्या विकासात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. ते डॉ. राहुल पंतवालावलकर यांचे वडील तसेच डॉ. रुपाली पंतवालावलकर यांचे सासरे होत. त्यांच्या निधनाने एक अभ्यासू, कार्यक्षम आणि समाजभिमुख नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg