loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई महानगरपालिकेत महायुतीने रिपब्लिकन पक्षाला किमान 16 जागा सोडाव्यात - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि.28- मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने रिपब्लिकन पक्षाला किमान 16 जागा सोडाव्यात. महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेत रिपब्लिकन पक्षाला सन्मानाने बोलाविले नाही आणि चर्चेत सहभागी करुन घेतले नाही. त्याबद्दल रिपब्लिकन कार्यकर्त्यामध्ये तीव्र नाराजी आहे. ही नाराजी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून उद्या मांडणार आहोत. अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसापुर्वी रिपब्लिकन पक्षाला महायुतीकडुन सन्मानजनक जागा मिळतील असा आम्हाला विश्वास आहे. कोणत्याही परिस्थितीत रिपब्लिकन पक्ष महायुतीसोबत राहणार असून सदरच्या राजकीय घडामोडीमध्ये महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाचे महत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणतात. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला निश्चित समाधानकारक जागा महानगरपालिका निवडणुकीत मिळतील असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. रामदासजी आठवले यांनी व्यक्त केला. आज बांद्रा येथील रिपाइंच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ना. रामदास आठवले बोलत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाने 26 वॉर्ड निवडले होते. चर्चेसाठी महायुतीकडे 26 वार्डांची यादी देण्यात आलेली आहे. त्या 26 वॉर्डापैकी किमान 16 जागा महायुतीने रिपब्लिकन पक्षाला सोडाव्यात अशी आग्रही मागणी ना.रामदास आठवले यांनी केली आहे. मागील काही दिवस जागा वाटपाच्या चर्चेत रिपब्लिकन पक्षाला चर्चेमध्ये सहभागी करुन घेतले नाही. भाजप शिवसेनेकडुन रिपब्लिकन पक्षाला चर्चेचे बोलावणे सुध्दा आलेले नाही. याबद्दल रिपब्लिकन पक्षात नाराजी आहे. ही नाराजी आपण उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडणार आहोत. महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट असले तरी रिपब्लिकन पक्षाचा माझा गट सर्वात मोठा गट आहे. आमचा रिपब्लिकन पक्ष ज्यांच्यासोबत जातो त्यांचा विजय होतो. आम्ही ज्यांना साथ देतो त्यांनाच सत्ता मिळते हा इतिहास आहे. त्यामुळे याही वेळेस रिपब्लिकन पक्ष हा महायुती सोबत राहणार असून महायुतीचाच विजय होणार आहे. महायुती आम्हाला सन्मानजनक जागा देतील असा विश्वास आहे असे ना. रामदास आठवले म्हणाले.

टाइम्स स्पेशल

2012 च्या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंच्या मनसेचे मोठे आव्हान असताना रिपब्लिकन पक्षाने शिवशक्ती - भिमशक्तीचा प्रयोग केल्यामुळे शिवसेना-भाजपची सत्ता मुंबई महानगरपालिकेत आली होती. 1992 मध्ये काँग्रेस सोबत असतांना रिपब्लिकन पक्षाचे मुंबईत 12 नगरसेवक होते तसेच तेंव्हा मुंबईचा महापौर सुध्दा रिपब्लिकन पक्षाचा झाला होता. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपला रिपब्लिकन पक्षाच्या ताकदीचा अंदाज आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला महायुतीत निश्चितच समाधानकारक जागा मिळतील असा विश्वास ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

जागा वाटपातील चर्चेत झालेली रिपब्लिकन पक्षाची नाराजी मुख्यमंत्र्याकडे आठवले मांडणार

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg