loader
Breaking News
Breaking News
Foto

युद्धवीर कॅप्टन विठ्ठलराव नारायणराव कदम यांना सैनिक रत्न पुरस्कार जाहीर

चौक, (अर्जुन कदम) युद्धवीर कॅप्टन विठ्ठलराव नारायणराव कदम यांना सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सैनिक रत्न पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. युद्धवीर कॅप्टन विठ्ठलराव नारायणराव कदम हे भारतीय लष्करात ९ जानेवारी १९५७ साली भरती झाले,३२ वर्ष सेवा करून १ ऑक्टोंबर १९८८ रोजी सेवा निवृत्त झाले. निवृत्त होईपर्यंत त्यांनी युद्ध मोहिमांमध्ये शौर्याने सहभाग नोंदविला आहे.गोवा मुक्ती संग्राम १९६०,चीनचे आक्रमण १९६२,पाकिस्तानचे आक्रमण १९६५,भारत-पाकिस्तान युद्ध १९७१ (पश्चिम भाग) त्यातून बांगला देशाची निर्मिती, भारत-पाकिस्तान युद्ध १९७१ (पूर्व भाग) ब्ल्यू स्टार ऑपरेशन १९८४.या सेवकाळात त्यांना सैन्य सेवा मेडल, समर सेवा मेडल १९६५, पूर्वी स्टार मेडल,पश्चिमी स्टार मेडल,फील्ड एरिया मेडल, नाइन इयर लाँग सर्विस मेडल, २५ वी आझादी मेडल,संग्राम मेडल,३० वर्ष सेवा मेडल. प्राप्त झाले असून अनेक सामाजिक संघटना, ग्राम पंचायत वावंढळ यांच्या वतीने शौर्य पूरस्कार,कोयना क्षत्रिय मराठा समाज यांच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्माननित करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सेवा निवृत्तीनंतरही त्यांनी समाजसेवेचा वसा कायम ठेवला. माजी आमदार सुरेश लाड यांच्या शिफारशीतून त्यांना महाराष्ट्र सरकारने SEO (Special Executive Officer) पद दिले.त्या पाच वर्षात उल्लेखनीय कार्य केले. तंटा मुक्ती अभियानाचे अध्यक्ष म्हणून गावातील सामाजिक सलोखा जपण्यासाठी मोलाचे योगदान दिले. तसेच गावातील सार्वजनिक जमिनीच्या प्रश्नांमध्ये प्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली.माजी सैनिक व वीरमाता, विधवा पत्नी यांना शासनाच्या विविध योजना व पेन्शन मिळवून देण्यासाठी शासनाकडे सातत्याने पत्रव्यवहार करून अनेक कुटुंबांना न्याय मिळवून देण्याचे महान कार्य त्यांनी केले आहे.देशसेवा, शौर्य, त्याग आणि समाजसेवा यांचा प्रेरणादायी प्रवास असलेल्या युद्ध वीर कॅप्टन विठ्ठलराव नारायणराव कदम यांना सैनिक रत्न पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg