रत्नागिरी - रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई पदासाठी पोलीस भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती त्याप्रमाणे ता.१३ फेब्रुवारी २६ ते १७ फेब्रुवारी २६ पर्यंत शारिरीक चाचणी परीक्षा पार पडली तसेच या १५ मार्च २०२६ रोजी लेखी परीक्षा पार पडली. शारिरीक चाचणी, लेखी परीक्षा यामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर अंतिम निकाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये गेली ५ वर्षे रत्नागिरी जिल्हयात सातत्याने उत्तम निकालाची परंपरा असणार्या अयांश विरेन स्पोट्स फाऊंडेशन व पोंक्षे सर यांच्या एमपीएससी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे १५ विदयार्थी महाराष्ट्र पोलीस दलात निवडले गेले आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांत कु. रेणुका कांबळे, कु. दामिनी कांबळे, कु. प्राची कोलगे, गौरी कदम, कु.रिसीता पोमेंडकर, कांचन मोरे, कु. हेमांगी देसाई, कु. तुलसीदास पवार, कु. ऋषिकेश साळवी, कु. अथर्व पाटील, कु अंकित म्हादलेकर, कु. अंकित सोलकर, कु. पंकज कांबळे, कु. संकेत शितप (रत्नागिरी) तर कु.भूषण जाधव (नवी मुंबई) यांचा समावेश आहे.
यशस्वी सर्व विद्यार्थी गेल्या २ ते ३ वर्षांपासून सातत्याने पोलीस भरती परीक्षांचा अभ्यास व शारिरीक परीक्षेचा सराव करत होते. सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द, मेहनत, पालकांचा पाठींबा व मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनामुळे त्यांना हे घवघवीत यश मिळाले आहे. यंदाच्या रत्नागिरी जिल्हा पोलीस भरतीमध्ये रत्नागिरी जिल्हयातील विदयार्थ्यांचे प्रमाण लक्षणीय असल्यामुळे जिल्हयात पोलीस भरतीची तयारी करणार्या विदयार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडल्या गेलेल्या सर्व विदयार्थ्यांचे अयांश विरेन स्पोर्टर्स फाऊंडेशन व पोंक्षे सरांच्या एमपीएससी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्यावतीने अभिनंदन करण्यात आले असून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.














































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.