खेड (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावर कळंबणी येथे शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सीएनजी गॅस टँकरला महिंद्रा कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या घटनेत एका महिला प्रवाशीसह काही जण जखमी झाले असून टँकर चालकाला मारहाण झाल्याचीही माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १५ मे २०२६ रोजी रात्री १२.२६ वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील कामाक्षी पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला. गणपतीपुळे येथून नाशिकच्या सिन्नरकडे जाणारा सीएनजी टँकर (क्र. MH 14 JL 5201) महामार्गावरून जात असताना पाठी मागून येणाऱ्या महिंद्रा कारने (क्र. MH 48 AW 7093) टँकरला जोरदार धडक दिली. धडकेनंतर कारचे मोठे नुकसान झाले.
या अपघातात पूजा सुमित गांगुर्डे (वय २३, रा. सिन्नर, नाशिक) या महिला प्रवासी जखमी झाल्या असून शैलेश जयसिंग गुरव (वय ३६, रा. अरवली) हेही जखमी झाले आहेत. अपघातानंतर कारमधील काही प्रवाशांनी सीएनजी टँकर चालकाला मारहाण केल्याची माहिती मिळत असून त्यामध्ये चालकही जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिजखाली सेवेसाठी उभी असलेली जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान, नाणीज धाम यांची २४ तास विनामूल्य अपघात मदत रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर यांनी जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे उपचारासाठी दाखल केले. या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.















































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.