loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रभू हंबर्डे यांना राज्यस्तरीय "आदर्श शिक्षक सेवा सन्मान" पुरस्कार

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील जि. प. आदर्श प्राथ. शाळा वेलदूर घरटवाडी येथील कार्यतत्पर व कर्तव्यदक्ष शिक्षक प्रभू रघुनाथ हंबर्डे यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनेल तर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र शिक्षक पॅनल (MSP) आयोजित आदर्श शिक्षक सेवा सन्मान सोहळा श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथे मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला . जि. प. आदर्श प्राथ. शाळा वेलदूर घरटवाडी येथील प्रभू रघुनाथ हंबर्डे हे उपक्रमशील शिक्षक म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात ओळखले जातात. विद्यार्थी प्रिय असणारे प्रभू रघुनाथ हंबर्डे यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यांची एकूण शिक्षक क्षेत्रात २० वर्षे सेवा झाली आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

  महाराष्ट्र शिक्षक पॅनल अध्यक्ष दीपक चामे ,सचिव सतीश कोळी, पंकज पालीवाल, विकी येलमटे, राज्य समन्वयक राजश्री पाटील, सर्व सन्माननीय पदाधिकारी व सदस्य महाराष्ट्र शिक्षक पॅनल शिक्षकांसाठी तळमळीने झटणारे नेतृत्व यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतली. महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या शिक्षक बांधवांना उचित मानसन्मान माध्यमातून मिळाला.प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर काम करणारे गुरुजन यांचा सन्मान सोहळा या माध्यमातून करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती प्रसिद्ध सिने अभिनेत्री भार्गवी चिरमुले, सुप्रसिद्ध कवियत्री गुंजन पाटील, सुप्रसिद्ध कवी डॉ. रोहित शिंगे आदि उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg