loader
Breaking News
Breaking News
Foto

नागपूर - मडगाव 'स्पेशल' ट्रेन आता कायमस्वरूपी, रत्नागिरीत थांबणार

रत्नागिरी [ डिजीटल डेस्क ] : गेल्या काही काळापासून विशेष किंवा तात्पुरत्या कालावधीसाठी सुरू केलेल्या ट्रेन नियमित करण्याची मोठी प्रक्रिया भारतीय रेल्वेने सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून विदर्भातून थेट गोव्यापर्यंत जाणारी द्विसाप्ताहिक ट्रेन सेवा नियमित करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. १६ मे २०२६ पासून नागपूर ते मडगाव या मार्गावर धावणारी विशेष ट्रेन नियमित सेवा म्हणून चालवली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०११३९ आणि ट्रेन क्रमांक ०११४० नागपूर-मडगाव-नागपूर द्विसाप्ताहिक विशेष ट्रेन सुरू करण्यात आली होती. या ट्रेनला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विदर्भातून थेट गोव्याला जाणारी ही सेवा नागपूर, शेगाव, नाशिक, कल्याण, पनवेल, रत्नागिरी, सावंतवाडी आणि मडगाव या मार्गावरून जात असल्याने या भागातील सर्व प्रवाशांना याचा लाभ होत होता. त्याशिवाय मुंबईकरांना कोकणात जाण्यासाठी एका ट्रेनचा पर्याय मिळत होता. त्यामुळेच ही ट्रेन आता नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नागपूर आणि मडगाव दरम्यान धावणारी 'स्पेशल' ट्रेन आता कायमस्वरूपी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे विदर्भ आणि कोकण जोडणारी ही सेवा आता अधिक सोयीस्कर होणार आहे. या ट्रेनला आता 'नियमित एक्सप्रेस'चा दर्जा मिळाला आहे. आता ट्रेनचा नवीन नंबर ११२०३/११२०४ असा असणार आहे. सुमारे १३३० किमी अंतरात ही ट्रेन एकूण २६ स्थानके घेते. नागपूरहून ही ट्रेन दर बुधवारी आणि शनिवारी दुपारी ३ वाजून ०५ मिनिटांनी सुटते आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी मडगाव येथे पोहोचते. परतीच्या प्रवासाला मडगावहून ही ट्रेन दर गुरुवारी आणि रविवारी रात्री ८ वाजता सुटते आणि दुसऱ्या दिवशी रात्री ०९ वाजून ३० मिनिटांनी नागपूर येथे पोहोचते. ही ट्रेन विदर्भ-खान्देश भागात वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ या स्थानकावर थांबते. उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई भागात नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल या ठिकाणी थांबते. कोकणात रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि करमाळी या स्थानकावर थांबते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg