loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ, संवेदनशील लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांना देवाज्ञा

प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ, संवेदनशील लेखक, कवी,अनेकांचे मदतगार,प्रेरक डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन झाले . आपला मुलगा डॉ. नाडकर्णी सारखा डॉक्टर बनावा " असे ज्याच्याबद्दल सुबुद्ध पालकांना वाटायचे....असे व्यक्तिमत्व..... समाजमनाला दिशा देणारे डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. मानसिक आरोग्याविषयी समाजात जागृती निर्माण करून असंख्य लोकांना नवसंजीवनी देण्याचे महान कार्य त्यांनी आयुष्यभर केले. त्यांच्या विचारांनी, लेखनाने आणि समुपदेशनाने अनेकांच्या जीवनाला सकारात्मक दिशा दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डाॅ.आनंद नाडकर्णी (जन्म- इ.स. १९५८) हे एक मराठी लेखक, नाटककार व मनोविकारतज्ज्ञ आहेत. डॉ. आनंद नाडकर्णी यांनी १९८० साली एम.बी.बी.एस आणि १९८४ साली मनोविकारशास्त्रामध्ये एम.डी या पदव्या मिळवल्या. मनोविकारांबद्दलच्या गैरसमजुतींविरुद्ध 'चळवळ' उभारण्यासाठी एक संस्था स्थापन करायची कल्पना डॉ. नाडकर्णी यांच्या मनात मनोविकारशास्त्राचे शिक्षण घेताना आली, आणि त्यांनी ती प्रत्यक्षात उतरवलीही. त्यानुसार, २३ मार्च १९९० रोजी ठाणे शहरात आयपीएच अर्थात इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ या संस्थेची औपचारिक स्थापना झाली. तीव्र मानसिक आजारांवर उपचार एवढ्यापुरतेच ठाण्यातील या संस्थेचे काम मर्यादित नाही. उपचारांसाठी येणारा मनोरुग्ण, त्याचे कुटुंबीय, दैनंदिन जीवनातील प्रश्नांमुळे गांजलेली व्यक्ती, कोणतीही समस्या नाही परंतु मानसशास्त्रीय ज्ञानाचा उपयोग स्व-विकासासाठी करू इच्छिणाऱ्या व्यक्ती, अशा सर्वांसाठी ही संस्था आहे. क्लिनिकल उपचार, समुपदेशन अशा रूढ मार्गांबरोबरच साहित्य, संगीत, नाट्य, चित्र, संवाद अशा आनंददायी साधनांचा कल्प्कतेने वापर केला जातो.

टाइम्स स्पेशल

संस्थेमध्ये साठ मनोविकारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक, पंचवीस आधार सदस्य आणि विविध सेवाभावी प्रकल्पांवर काम करणारे तीनशे प्रशिक्षित स्वयंसेवक कार्यरत आहेत. संस्थेचा स्वतःचा मनोआरोग्य प्रशिक्षण विभाग आहे. स्वतंत्र माध्यम विभाग, औद्योगिक प्रशिक्षण विभाग, क्रीडा मानसशास्त्र विभाग, संशोधन विभाग असे विविध गट कार्यरत आहेत. शिवाय एकाच वेळी अनेक वयोगटांसाठी अनेक सेवा, उपक्रम, प्रकल्प यांचे एक जाळे विणलेले आहे. कोणत्याही सरकारी किंवा परदेशी मदतीशिवाय ही संस्था काम करते, आणि तरीही संस्थेचं सेवाशुल्क नाममात्र आहे. डॉ. शुभा थत्ते, डॉ. अनुराधा सोवनी या मानसशास्त्रज्ञांबरोबरच विविध क्षेत्रातल्या अनेकांनी या संस्थेच्या वाटचालीत मोलाची साथ दिली आहे

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg