loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी येथे किया नवीन फेसलिफ़्ट सिरॉसचा अनावरण समारंभ

रत्नागिरी - किया मोटर्स इंडिया ने नुकत्याच लॉन्च केलेल्या किया नवीन फेसलिफ़्ट सिरॉसचा अनावरण समारंभ रत्नागिरी येथील शोरूममध्ये प्रियेश मालवीय एस बी आई चिफ मॅनेजर रत्नागिरी आणि महेश भाटकर अनघा दत्त टूर्स आणि ट्रॅव्हल्सचे मालक ह्याच्या शुभ हस्ते पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर गाडी 1.0L टर्बो पेट्रोल आणि 1.5L डिझेल या दोन्ही इंजिन सोबत ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये उपलब्ध आहे. तसेच सहा एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल असिस्ट कंट्रोल, टी पी एम एस, एबीएस, ईबिडी, ट्रॅक्शन कंट्रोल, वेहिकल मॅनेजमेंट सिस्टीम सोबत फाईव्ह स्टार BNCAP सेफ्टी रेटिंग असलेली ही कार पॅनोरमिक सनरूप, 17 इंच अलॉय व्हील्स, नवीन डिझाईन बंपर आणि नवीन एलईडी फॉग लॅम्प्स, फ्लेक्झिबल रियर सीट्स या नावीन्यपूर्ण वैशिष्ट्या सहित उपलब्ध असेल. पेट्रोल कार 8.39 लाख तसेच डिझेल कार 9.99 लाख रुपये पासून सुरू होत आहे. नवीन किया सिरॉस ही एकूण नऊ रंगात उपलब्ध आहे.

टाइम्स स्पेशल

ह्या अनावरण प्रसंगी कोंडुसकर कीयाचे बिझनेस हेड अमोल पिसाळ, जनरल मॅनेजर श्रीराम पडवळे, सेल्स मॅनेजर विपेंद्र नलवडे व कोंडुसकर कियाचे सर्व कर्मचारी आणि मोठा ग्राहक वर्ग उपस्थित होते. कोंडुसकर कियाचे चेअरमन दीपक कोंडुसकर व मॅनेजिंग डायरेक्टर रोहित कोंडुसकर यांनी ग्राहकांना शोरूमला भेट देऊन गाडीची माहिती व टेस्ट ड्राईव्ह घ्यावी असे आवाहन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg