loader
Breaking News
Breaking News
Foto

देवचाफ्याची माळ विकली गेली तब्बल दीडशे ते दोनशे रुपयाला...

मालवण (प्रतिनिधी) - गुढीपाडव्यासाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या देवचाफ्याच्या माळेची मोठी मागणी लक्षात घेऊन आज पाडव्याच्या पार्श्वभूमीवर मालवणच्या बाजारात देवचाफ्याच्या एका माळेचा दर प्रारंभी १०० रु. व त्यानंतर सुमारे १५० ते २०० रुपयांपर्यंत पोहचल्याचे दिसून आले. तर गावठी गुलाबाची फुले वीस रुपयाला ६ नग अशी विकली जात होती. गुलाबाच्या फुलाबरोबरच झेंडू व शेवंती या फुलांचा दरही चढताच राहिला. गुढीपाडव्याच्या सणाला गुढी उभारताना गुढीला गावठी पांढऱ्या चाफ्याचा म्हणजे देवचाफ्याची माळ लावली जाते. मात्र सध्या कोकणात देवचाफ्याची झाडे कमी झाल्याने अलीकडच्या काही वर्षात नागरिकांना बाजारात विक्रीसाठी येणारे देवचाफ्याच्या माळा विकत घ्याव्या लागतात. माळ विकणाऱ्यांची तसेच माळ खरेदी करणाऱ्यांचीही संख्या वाढल्याने यापूर्वी ४० ते ५० रुपयांपर्यंत मिळणाऱ्या चाफ्याच्या माळेची किंमत यावर्षी कमालीची वाढली. मालवणच्या बाजारात चाफ्याची २० ते २२ फुले असलेली एक माळ तब्बल दीडशे ते दोनशे रुपयाने विकली गेली. तर गुलाबाची फुले वीस रुपयाला सहा अशी विकली जात होती. तसेच झेंडूची फुले दराने विकली गेली. एकूणच सणासुदीला फुलांना मिळालेला तेजीचा दर विक्रेत्याना मन सुखावून टाकणारा होता आज बाजारपेठेत देवाचाप्याची फुले तसेच त्याची माळ आणि किमंत याचीच चर्चा होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg