दापोली (वार्ताहर) : दापोली तालुक्यातील गव्हे येथील अमृते सेवा चॅरिटेबल ट्रस्ट, भरारी दापोली तालुका बचत गट महासंघ आणि दापोली पंचायत समितीच्या उमेद विभागाच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या डॉ. स्वामिनाथन सभागृहात सेंद्रिय शेती महिला शेतकरी मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्याला कुलगुरू डॉ. संजय भावे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर बदलापूर तालुक्यातील बेंडशीळ येथील कृषिभूषण राजेंद्र भट यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. विशेष अतिथी म्हणून डॉ. अशोक निर्बाण उपस्थित होते. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय मार्गदर्शनात शैलजा अमृते यांनी आपल्या जीवनप्रवासासह उत्कर्ष महिला मंडळ, भरारी महासंघ आणि अमृते ट्रस्टच्या कार्याचा आढावा घेतला. यानंतर डॉ. संजय भावे आणि राजेंद्र भट यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व, आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत शेती पद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. अशोक निर्बाण यांनीही आपल्या मनोगतातून महिला शेतकर्यांना सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे आवाहन करत प्रेरणादायी विचार मांडले. या मेळाव्यास पंचायत समितीच्या उमेद विभागाचे अधिकारी सर्वश्री लांजेकर यांच्यासह महिला, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टाइम्स स्पेशल
आंतरराष्ट्रीय मॅथ्स, सोशल स्टडीज, सायन्स, ड्राॅंईंग ऑलिंपियाड परीक्षेत रोटरी स्कूलचे दैदिप्यमान यश

















































































































































































































































.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.