loader
Breaking News
Breaking News
Foto

आंतरराष्ट्रीय मॅथ्स, सोशल स्टडीज, सायन्स, ड्राॅंईंग ऑलिंपियाड परीक्षेत रोटरी स्कूलचे दैदिप्यमान यश

खेड (प्रतिनिधी) - इंडियन टॅलेंट ऑलिंपियाड यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडच्या 7 विद्यार्थ्यांनी द्वितीय फेरीतील परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करून रोटरी स्कूलचे नाव उज्ज्वल केले. सदरच्या इंटरनॅशनल सायन्स ऑलिंपियाड, इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिंपियाड, इंटरनॅशनल सोशल स्टडीज, ऑलिंपियाड, इंटरनॅशनल ड्राॅंईंग ऑलिंपियाड परीक्षांच्या द्वितीय फेरी परीक्षेत संपूर्ण देशभरात असंख्य विद्यार्थी सहभागी झाले होते. या परीक्षेच्या जाहीर झालेल्या निकालात रोटरी स्कूल खेडच्या इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिंपियाड कु. कविश केकाणे ( इयत्ता - पाचवी ) स्टेटस टॉपर याने 700 रुपये शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. कु. पूर्वी सुर्यवंशी (इयत्ता - सहावी) व कु. वीर कालेकर ( इयत्ता - सातवी) इंटरनॅशनल सोशल स्टडीज ऑलिंपियाड कु. स्वप्नीश गोस्वामी ( इयत्ता - सातवी ), इंटरनॅशनल सायन्स ऑलिंपियाड कु. दिग्विजय धुमाळ ( इयत्ता - नववी ), इंटरनॅशनल ड्राॅंईंग ऑलिंपियाड कु. त्रिवेणी गमरे ( इयत्ता - दहावी ) या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य पदक प्राप्त केले आहे. तसेच इंटरनॅशनल ड्राॅंईंग ऑलिंपियाड कु. आयुषा तांबट ( इयत्ता - नववी ) स्टेट टॉपर हिने 1200 रुपये शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. वरील यशस्वी विद्यार्थ्यांना मॅथ्स, सोशल स्टडीज, सायन्स, ड्राॅंईंग या विषय शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg