loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंढर येथे भव्य पालखी नृत्य सोहळ्याचे आयोजन

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील मुंढर, शिरबारवाडी येथे दि. २० मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत भव्य पालखी नृत्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे आयोजन जिल्हा परिषद सदस्य श्री प्रमोद गांधी (मनसे – गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष) यांच्यातर्फे करण्यात आले असून, कोकणातील पारंपारिक संस्कृती आणि भक्तीपर परंपरा जपण्याचा हा एक सुंदर उपक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये विविध मान्यवर पालखी नृत्य पथकांचा सहभाग असणार आहे. यात स्वयंभू श्री सोमेश्वर पालखी नृत्य पथक, मुंढर, श्री वरदान देवी पालखी नृत्य पथक, पालपेणे, श्री चंडिकाई पालखी नृत्य पथक, मळण तसेच श्री देव गांगोबा पालखी नृत्य पथक, करंबेळे (ता. संगमेश्वर) यांचा समावेश आहे. पालखी नृत्य हा कोकणातील पारंपारिक आणि भक्तीमय वारसा जपणारा लोककला प्रकार असून, या सोहळ्याद्वारे स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या सोहळ्यास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg