loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालयाचा कायापालट; १३ कोटींच्या निधीतून इमारतींच्या बळकटीकरणाचे काम सुरू

​रत्नागिरी : रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत असलेल्या प्रादेशिक मनोरुग्णालयाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी शासनाने कंबर कसली असून, येथील इमारतींच्या नुतनीकरणाच्या कामाला आता प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या या रुग्णालयासाठी १३४५.३८ लाख रुपयांच्या प्रशासकीय खर्चाला मंजुरी देण्यात आली असून, त्यानुसार सध्या युद्धपातळीवर काम सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मनोरुग्णालयातील जुन्या वॉर्डांना नवे रूप मिळणार आहे. रुग्णालयाच्या आवारातील एकूण २५ वॉर्ड इमारतींचे बळकटीकरण आणि नुतनीकरण करण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. केवळ इमारतीच नव्हे, तर रुग्णांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी आवारातील ९०० मीटर लांबीच्या रस्त्यांचे नुतनीकरणही या कामात समाविष्ट असून त्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ४५० मीटर लांबीच्या सुरक्षा रक्षक भिंतीचे बळकटीकरण आणि नुतनीकरणाचे कामही वेगाने सुरु करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

​या संपूर्ण प्रक्रियेसाठी अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ रत्नागिरी यांनी ११७२.३३ लाख रुपयांची तांत्रिक मान्यता दिली आहे. निविदा प्रक्रियेनंतर ९८७.२१ लाख रुपयांच्या निविदा किमतीनुसार 'आर. सी. बिडवे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर्स' यांच्यामार्फत हे काम पूर्ण केले जात आहे. रुग्णालय परिसरात सुरू असलेल्या या विकासकामांमुळे रुग्णांना अधिक चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवा आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध होणार आहे. स्थानिक प्रशासनाकडून या कामाच्या गुणवत्तेवर आणि वेळेवर विशेष लक्ष दिले जात असून, लवकरच मनोरुग्णालय एका सुसज्ज आणि आधुनिक स्वरूपात पाहायला मिळणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg