दापोली (सागर गोवळे) - बोरिवली (आडिवाडी) येथील ग्रामदैवत आई सातमाई नव्हानकरीन देवीचा वार्षिक गोंधळ सोहळा अत्यंत मंगलमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमांना मुंबईसह उपनगरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. देवीच्या या उत्सवानिमित्त आडिवाडी परिसरात पहाटेपासूनच चैतन्याचे वातावरण होते. सकाळी देवीची विधिवत पूजा, अभिषेक आणि अलंकार पूजा करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी देवीच्या मुख्य 'गोंधळ' कार्यक्रमाला सुरुवात झाली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि देवीच्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
नोकरी-धंद्यानिमित्त मुंबईच्या विविध भागात स्थायिक झालेले आडिवाडी ग्रामस्थ आणि देवीचे भक्त या दिवशी खास दर्शनासाठी बोरिवलीत दाखल होतात. 'आई सातमाई'वर असलेल्या अढळ श्रद्धेपोटी भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. गोंधळ्यांनी सादर केलेल्या देवीच्या गीतांनी आणि सादरीकरणाने उपस्थित भाविकांची मने जिंकली. भक्ती आणि परंपरेचा सुरेख संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला. गोंधळ समाप्तीनंतर आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. स्थानिक मंडळाने आणि ग्रामस्थांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. शिस्तबद्ध नियोजन आणि भक्तांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यावर्षीचा आई सातमाई नव्हानकरीन देवीचा गोंधळ सोहळा अविस्मरणीय ठरला.



















































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.