loader
Breaking News
Breaking News
Foto

रायगडातून हजारो आगरी-कोळी बांधव वाजत-गाजत कार्लागडावर!

पेण : आगरी, कोळी, कराडी बांधवांची कुलदेवता असलेल्या कार्लाच्या एकवीरा देवीची यात्रा शुक्रवारपासून सुरू होत आहे. यानिमित्त रायगड जिल्ह्यातून हजारो भाविक कार्लागडावर पालख्या, दिंड्या घेऊन वाजत-गाजत रवाना झाले आहेत. दि.4 व दि.5 रोजी यात्रेचा मुख्य दिवस असणार आहे. यामुळे गुरूवारी सकाळीही हजारो भाविक कार्लागडावर रवाना होतील, आणि आई एकवीरेचे दर्शन घेतील. कार्लागडावरील एकवीरेच्या यात्रेनंतर पाच-सहा दिवसांनी पेण तालुक्यातील गावांमधील यात्रोत्सवांना सुरुवात होणार आहे. ग्रामस्थांकडून यात्रांची तयारी सुरू असतानाच दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण, तर काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाल्याने भाविकांचा हिरमोड झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

श्री एकविरा देवी चैत्री उत्सव 2025 पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने मावळचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यांनी 30 मार्च रोजी मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 6 एप्रिल रोजी रात्री 12 वाजेपर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-2023 मधील कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशान्वये वरील कालावधीत शोभेची दारु, फटाके गडावर नेणे, गडावर फटाके, वाद्ये, ढोल, ताशे, वाजविण्यास व गडावर नेण्यास बंदी करण्यात आली आहे.

टाईम्स स्पेशल

एकाच प्रकारची व रंगाची कपडे, वेशभूषा परिधान करणे, विशेषत: टी शर्ट वापरणे, कोंबडे, बकरे, पशु, पक्षी यांचा बळी देणे व त्यांना मंदिरावर सोडणे, कार्ला लेणी व परिसरातील ऐतिहासिक वास्तु व शिल्पांना हानी पोहचविणे अथवा विद्रुपीकरण करणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188 मधील तरतुदी व प्रचलित कायद्याप्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg