loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्थेला १ कोटी ४५ लाखांचा ढोबळ नफा

खेड (प्रतिनिधी) - शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खेड या पतसंस्थेला सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात एक कोटी पंचेचाळीस लाखांचा ढोबळ नफा झाला, तसेच तरतुदी वजा जाता एक कोटी साठ हजार निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरविंद तोडकरी यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संस्थेचे कार्यक्षेत्र रत्नागिरी जिल्हा असून जिल्हयामध्ये पतसंस्थेच्या खेड, भरणे, दापोली, मंडणगड, शृंगारतळी, चिपळूण अशा सहा शाखा असून मुख्य कार्यालय खेडमध्ये आहे. पतसंस्थेने गरजूंना जामीन तारण कर्ज, वाहन तारण कर्ज, स्थावरतारण कर्ज, व्यवसाय तारण कर्ज अशाप्रकारे केलेल्या कर्ज वितरणामध्ये सोने तारण कर्जासारख्या सुरक्षित कर्जाचे प्रमाण जास्त आहे. पतसंस्थेने आतापयर्ंत राखलेल्या आदर्शाप्रमाणे कामगिरीत सातत्य राखले आहे. पतसंस्थेच्या सर्व शाखा नफ्यात आहेत, तसेच सामाजिक बांधिलकी या नात्याने सर्व सभासदांचा रूपये २,००,०००/- चा अपघाती विमा उतरविण्यात आलेला आहे. पतसंस्थेने केलेल्या आजवरच्या प्रगतीमध्ये संस्थेचे संचालक मंडळ, सल्लागार, कर्मचारी, सभासद, ग्राहक, ठेवीदार व हितचिंतक यांचे महत्वाचे योगदान असल्याचे पतसंस्था अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष मिलींद इवलेकर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनय महाजन यांनी नमूद केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg