loader
Breaking News
Breaking News
Foto

माईण येथील सुखटणकर कुटुंबीयांची ना. नितेश राणे यांनी घेतली भेट; जळीत घराची केली पाहणी ---

कणकवली(प्रतिनिधी)- कणकवली तालुक्यातील माईण येथील अनिल दिनकर सुखटणकर यांच्या घराला अचानक भीषण आग लागली होती. या आगीत घर संपूर्णतः जळून खाक झाले होते. पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी सुखटणकर कुटुंबीयांची भेट घेऊन घर जळालेल्याची वस्तुस्थिती जाणून घेतली व पाहणी केली. सुखटणकर कुटुंबास योग्य ती मदत मिळावी यासाठी स्थानिक प्रशासन व अधिकारी व वीज मंडळ यांनी आवश्यक पावले उचलावीत, अशा सूचना नामदार नितेश राणे यांनी दिले आहेत. मत्स्य व्यवसाय व बंदर विकास तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी माईण गावाला भेट देऊन आपतग्रस्त कुटुंबाची भेट घेतली आणि नुकसानग्रस्त ठिकाणाची पाहणी केली. सदर आगीच्या घटनेचा पंचनामा ग्राम महसूल अधिकारी, ओटव यांनी तयार करून संबंधित कार्यालयात सादर केला आहे. या अहवालास अनुसरून पुढील मदत व कार्यवाही करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आदेश दिले आहे. यावेळी मंडळ अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg