उर्दू वाचन कार्यक्रम अंतर्गत हाॅटेल वर्षा पॅलेस छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे नुकतेच महाराष्ट्र राज्यस्तरीय उर्दू परिसंवाद कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यातून अनेक उर्दू शिक्षकानी भाग घेतला होता.यात उर्दू वाचन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व कार्यवाहीचा आढावा पी.पी.टी , टीचींग लर्निग मटेरियल व पोस्टर निर्मिती अशा तीन उपक्रमांद्वारे सादर करणे हा प्रमुख हेतू होता.यानुसार प्रत्येक जिल्ह्याने आपले सादरीकरण केले.रत्नागिरी तालुक्या मार्फत समस्त रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत उपक्रमशील शिक्षक व हरहुन्नरी व्यक्तित्व असलेले श्री.मुनाफ गुहागरकर यांनी आपल्या नाविन्यपूर्ण पी.पी.टी. चे प्रभावी सादरीकरण करून प्रथम क्रमांक व श्री.रियाज मुजावर यांनी टीचींग लर्निग मटेरियल सादरीकरणात प्रथम क्रमांक ,तसेच दापोली तालुक्या मार्फत समस्त रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत शाहीन अब्दुल कादिर सय्यद यांनी पोस्टर निर्मिती सादरीकरणात तृतीय क्रमांक पटकावीत रत्नागिरी जिल्ह्याची शान राखली आहे.
यापूर्वी देखील महाराष्ट्र राज्य स्तरावर रत्नागिरी जिल्ह्यातून अनेक विविध उपक्रमांमध्ये उर्दू शिक्षकनी सहभाग घेऊन नाविन्यपूर्ण यश संपादित केलेले आहे. ही यशाची प्रथा आजही कायम राखत या प्राप्त केलेल्या अभिमानास्पद यशाबद्दल श्री.मुनाफ गुहागरकर , श्री.रियाज मुजावर ,व शाहीन अब्दुल कादिर सय्यद यांचे व यांना सहकार्य करणारे रत्नागिरी व दापोली तालुक्यातील सर्व उर्दू शिक्षकांचे व यांना मार्गदर्शन करणारे डायट प्राचार्य मा.शिवलकर साहेब ,उर्दू विभाग प्रमुख सौ.दिपा सावंत यांचे तसेच समस्त रत्नागिरी जिल्ह्यातील उर्दू शिक्षकांचे जिल्ह्याध्यक्ष श्री.हिदायत नाईक व समस्त अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ जिल्हा रत्नागिरी तर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.
टाइम्स स्पेशल
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.