पनवेल : शहरातील टिळक रोड, महात्मा फुले रोड, एचओसी कॉलनीच्या मागील रोड, गडकरी मार्ग आणि महात्मा गांधी मार्ग या अत्यंत महत्त्वाच्या व वर्दळीच्या भागातील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे हैराण झाले आहेत. विकासकामे आणि गॅस पाईपलाईनच्या खोदकामात भूमिगत वीजवाहिन्या तुटण्याचे प्रमाण वाढल्याने हा प्रश्न गंभीर बनला होता. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक तथा पनवेल महानगरप्रमुख ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून एका विशेष समन्वय बैठकीची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत आयुक्त मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आता 'टास्क फोर्स' स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरात सध्या काँक्रिटीकरणाचे आणि महानगर गॅसच्या जोडणीचे काम जोमाने सुरू आहे. मात्र, महापालिका आणि महावितरण यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने कंत्राटदारांकडून खोदकाम करताना वीजवाहिन्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होते. विशेषतः जुन्या पनवेलमधील मुख्य रस्ते आणि वस्त्यांमध्ये हा त्रास अधिक जाणवत होता. नियमानुसार, रस्त्याच्या कामात आडव्या येणाऱ्या वाहिन्या कंत्राटदाराने स्वखर्चाने अंडरग्राउंड करणे आवश्यक असताना, प्रशासकीय ताळमेळ नसल्याने या कामात दिरंगाई होत होती. ही बाब ॲड. प्रथमेश सोमण यांनी पुराव्यांसह प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. सोमण यांच्या सूचनेनुसार व मागणीनुसार आयोजित या बैठकीत असा निर्णय झाला की, उद्यापासून कोणत्याही रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी महापालिका, महावितरण आणि संबंधित कंत्राटदार यांची 'टास्क फोर्स' प्रत्यक्ष जागेवर जाऊन समन्वय साधेल. यामुळे खोदकामात वाहिन्या तुटण्याचे प्रकार थांबणार असून नागरिकांना विनाकारण अंधारात राहावे लागणार नाही.
या महत्त्वपूर्ण बैठकीला अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, शहर अभियंता संजय कटेकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. माने, शहर अभियंता श्री. सातपुते व श्री. देशमुख उपस्थित होते. तसेच शिवसेनेच्या वतीने पनवेल समन्वयक राहुल गोगटे, उपमहानगर प्रमुख महेश सावंत, शहरप्रमुख प्रसाद सोनावणे, शहर संघटक अभिजीत साखरे, उपशहरप्रमुख अर्जुन परदेशी, तळोजा विभाग प्रमुख प्रकाश म्हात्रे, तालुका उपसंघटक नरेश नरसिंगे, मायनॉरिटी सेलचे अराफत पटेल आणि मिलिंद निंबाळकर यांनी बैठकीत सहभाग घेतला. प्रथमेश सोमण यांच्या या सक्रिय पुढाकारामुळे शहरातील प्रलंबित वीज समस्या सुटण्यास मोठी मदत होणार आहे.





















































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.