दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यात गेले काही दिवस अवकाळी वादळी वार्यासह पावसाने झोडपून काढणे सुरू केले आहे. वादळी वार्यासह पडलेल्या पावसाने अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले. चार दिवसांपूर्वी मोर्ले बागवाडी या ठिकाणी जवळपास वीस मिनिटे झालेल्या चक्रीवादळाने क्षणात बागायती, मोठी फळ झाडे आडवी करत वीस पेक्षा जास्त शेतकरी बांधवांचे लाखो रुपये नुकसान केले. यात हजारो सुपारी झाडे, तसेच आंबा, फणस, साग तसेच इतर झाडांचा समावेश आहे. सरपंच सेवा संघटना अध्यक्ष प्रविण गवस यांना समजताच मोर्ले सरपंच तसेच तालुका कृषी अधिकारी कर्मचारी यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करण्यास लक्ष वेधले.
जंगली हत्ती, गवारेडे यांच्याकडून नुकसान सुरू असताना झालेल्या चक्रीवादळाने मात्र शेतकरी बांधवांना जबरदस्त दणका दिला. मोर्ले बागवाडी येथे बसलेल्या चक्रीवादळाने येथील बागायतदार शेतकरी, दिप्ती मणेरीकर, सतीश मणेरीकर, अनिल मणेरीकर, शिरीष कुमार मणेरीकर, मिलिंद मणेरीकर, नितीन मणेरीकर, शरद मणेरीकर, गोविंद मणेरीकर, विनय मणेरीकर, संजय मणेरीकर, अभय मणेरीकर, रत्नकांत कारापूरकर आदी शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.























































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.