loader
Breaking News
Breaking News
Foto

महाड नाका येथे खेड नगरपरिषदेमार्फत उभारण्यात आलेल्या भव्य व्यापारी संकुलाचे उद्घाटन

खेड (प्रतिनिधी) - खेड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्थानिक व्यापाऱ्यांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आज खेड नगरपरिषद क्षेत्रातील महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला. महाड नाका येथे खेड नगरपरिषदेमार्फत ₹१,६१,३८,८०४/- निधीतून उभारण्यात आलेल्या भव्य व्यापारी संकुलाचे उद्घाटन गृहराज्यमंत्री ना.योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. तसेच भाऊसाहेब पाटणे व्यापारी संकुलाच्या विस्तारित बांधकामाचे लोकार्पण करून शहराच्या व्यावसायिक विकासाला नवी गती देण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ही व्यापारी संकुले स्थानिक व्यापाऱ्यांसाठी आधुनिक व सक्षम व्यासपीठ ठरणार असून रोजगारनिर्मिती आणि शहराच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. यावेळी नगराध्यक्षा सौ. माधवी राजेश बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश गणपत चिकणे, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, शहरप्रमुख कुंदन सातपुते, गटनेते निकेतन पाटणे, बांधकाम सभापती सुनिल दरेकर तसेच विविध मान्यवरांसह नगरसेवक, पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg