चिपळूण [ नंदकुमार चिटणीस ] : कसबा-संगमेश्वर येथे महाराष्ट्र राज्याचे अप्पर मुख्य सचिव श्री. विकास खरगे व अधिकारी वर्ग यांच्या समवेत आज छत्रपती संभाजी महाराज स्मारक व परिसर जागेची प्रत्यक्ष पाहणी आमदार शेखर निकम यांनी केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाला साजेसा, प्रेरणादायी व भव्य स्मारक, पुरातन मंदिरे, सरदेसाई वाडा परिसराचे संवर्धन, जिर्णोद्धार व विकास करणे याबाबत महाराष्ट्र शासन सकारात्मक असून, याअनुषंगाने स्मारकाच्या विकासासाठी आवश्यक सर्व बाबींची पुर्तता करण्याचे काम सुरू आहे.
यासंदर्भात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन कसबा-संगमेश्वर येथील ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले होते. सोबतच अजितदादा यांनी प्रत्यक्ष स्मारक स्थळी भेट देवून पाहणी केली होती. यावेळी अजितदादा यांचेकडे स्मारकासाठी आवश्यक निधी, नियोजन आणि प्रशासकीय मान्यतांबाबत भूमिका मांडली होती,असे आमदार निकम म्हणाले .
अजितदादा पवार यांनीही या विषयाकडे विशेष लक्ष देत छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृती जतन करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले होते. या स्मारकाच्या माध्यमातून इतिहास जतन होण्यासोबतच भावी पिढीला प्रेरणा मिळेल, तसेच संगमेश्वर परिसराच्या पर्यटन व सांस्कृतिक विकासालाही चालना मिळणार आहे. कसबा-संगमेश्वर येथील हे स्मारक छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रम, त्याग आणि हिंदवी स्वराज्यासाठीच्या अमूल्य योगदानाचा गौरवशाली वारसा ठरणार आहे. असेही आमदार निकम यांनी सांगितले .


























































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.