loader
Breaking News
Breaking News
Foto

'तारे जमीनपर चित्रकला स्पर्धेत एम.आय. हजवानी शाळेच्या विदयार्थ्याचे उत्तुंग यश

खेड - अल् मदिना वेलफेअर असोशिएशन व्दारा संचलित एम.आय. हजवानी शाळेच्या विद्यार्थ्यांनी कोकणी मुस्लीम संघ खेड आयोजित 'तारे जमीनपर' चित्रकला स्पर्धेत  चमकदार कामगिरी केली. तारे जमीनपर चित्रकला स्पर्धेत वेगवेगळ्या गटातून शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. गट -१ ज्यू. केजी ते २ री - या गटातून फरीहा इम्रान खोत (इयत्ता १ली), गट -२ ३ री ते ४ थी - या गटातून अफरा अरीफ शेख (इयत्ता ४ थी), गट -३ ५ वी ते ७ वी - या गटातून रूश्दा रोशनखान सरगुरु (इयत्ता ७ वी) व गट -४ ८ वी ते १० वी - या गटातून आयेशा असिफ रावल (इयत्ता ९ वी) या विद्यार्थीनींनी या स्पर्धेत यश मिळवून एम.आय. हजवानी शाळेचे नाव उज्ज्वल केले. या यशस्वी विद्यार्थीनींना शाळेचे चित्रकला शिक्षक देवरुखकर नितीन व पांचाळ सुयोग यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सर्व यशस्वी विद्यार्थीनींचे संस्थेचे अध्यक्ष बशीरभाई हजवानी, उपाध्यक्ष निसार खतीब, स्कूल कमिटी चेअरमन सिकंदर जसनाईक, संस्था सचिव मन्सूर मुकादम, सह सचिव शौकत मुजावर, खजिनदार गुलाम मोहिद्दीन तांबे, सह खजिनदार सिराज पटेल, संचालक हनिफ घनसार आरीफ मुल्लाजी, निसार सुर्वे, दुर्वेश पालेकर, वहाब बिजले, जिब्रान हजवानी, महामुद हजवानी, अखलाक हजवानी, हनिफ तांबे, इब्राहीम हजवानी, आदम हजवानी या सर्व पदाधिका-यांनी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सलवा तिसेकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी भरभरून कौतुक केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg