loader
Breaking News
Breaking News
Foto

एमएनजीएलच्या नावाने लाखो रूपयांचा गंडा

सावंतवाडी : शहरातील सर्वोदय नगर येथील रहिवासी असलेल्या एका महिलेला महाराष्ट्र नॅचरल गॅस प्रा. लिमिटेड गॅस कंपनीच्या नावाखाली आलेल्या एका बनावट फोन कॉलमधून तब्बल १ लाख ८५ हजार रुपयांचा चुना लावण्यात आला आहे. सायबर भामट्यांनी त्यांच्या खात्यातून ही मोठी रक्कम लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आज सकाळी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीचा प्रतिनिधी बोलत असल्याचे सांगून एक फोन आला. गॅस कनेक्शन किंवा बिल अपडेट करण्याच्या बहाण्याने त्यांना काही स्टेप्स फॉलो करायला सांगण्यात आले. यादरम्यान त्यांच्या मोबाईलवर आलेली लिंक किंवा माहिती 'स्वाईप' करताच त्यांच्या बँक खात्यातून १ लाख ८५ हजार रुपये त्वरित डेबिट झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी या घटनेची माहिती दिली.या घटनेनंतर सावंतवाडी नगरपालिकेचे सभापती प्रतीक बांदेकर यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कंपनीकडून अशा प्रकारे कोणत्याही ग्राहकाला अधिकृत कॉल येत नाही. नागरिकांनी कोणत्याही अनोळखी नंबरवरून येणाऱ्या फोनवर विश्वास ठेवू नये किंवा आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

सावंतवाडीतील प्रकार ; बनावट फोन कॉलमधून फसवणूक

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg