खेड (दिलीप देवळेकर)- खेड तालुक्यातील भरणे नाका परिसरात भीषण अपघात घडून एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. नवभारत हायस्कूलसमोर महामार्ग ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत हा अपघात झाला असून वाहनचालकाने आपल्या वाहनासह घटनास्थळावरून पलायन केले.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास अमित सूर्यकांत फावरे (वय 37, रा. लोटे मालवाडी) हे महामार्ग ओलांडत असताना गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या काळ्या रंगाच्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावून जखमी अवस्थेतील फावरे यांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित कारचालकाने वाहन भरधाव वेगात चिपळूणच्या दिशेने पळवून नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही तरुणांनी तात्काळ पोलिसांच्या आपत्कालीन क्रमांक 112 वर संपर्क साधून घटनेची माहिती दिली. खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अज्ञात वाहन व चालकाचा शोध सुरू आहे. या प्रकरणी अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.


















































































































2.jpg)





























.jpg)































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.