रत्नागिरी - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ अंतर्गत असलेले ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी’ ‘मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी’ आणि ‘आसमंत फाउंडेशन, रत्नागिरी’ याच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय ‘मत्स्य पदार्थ निर्मिती प्रात्यक्षिक-प्रशिक्षणाचे’ यशस्वी आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम आसमंत फाउंडेशन, रत्नागिरीच्या महिला सबलीकरण कार्यक्रम अंतर्गत ‘परिषद दालन, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी’ येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रम आयोजन करण्याकरिता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ, दापोलीचे कुलगुरु डॉ. संजय भावे, मा. संचालक, विस्तार शिक्षण, डॉ. राजेश ठोकळ, संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच या कार्यक्रम आयोजन करण्याकरिता आसमंत फौंडेशन, रत्नागिरीकडून आर्थिक सहाय्य मिळाले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. चौधरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये मत्स्य व्यवसायाचा शाश्वत विकास करायचा असेल तर, पकडलेल्या मासळीवर प्रक्रिया करून मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ तयार करणे गरजेचे आहे, जेणेकरून मच्छिमारांच्या उत्पन्नात वाढ होईल असे सांगितले. मत्स्य पदार्थ निर्मितीच्या प्रशिक्षणाची जबाबदारी कुलगुरु डॉ. संजय भावे यांनी निर्देशित केल्याप्रमाणे सागरी जीव शास्त्रीय संशोधन केंद्र आणि मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन यांनी घेतली आहे.
या मत्स्य पदार्थ निर्मिती प्रात्यक्षिक-प्रशिक्षणामध्ये एकूण ६९ लाभार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रम मुख्यता उमेद-क्रांती प्रभाग संघच्या तिवंडेवाडी, बसणी, शिरगाव, काळबादेवी येथील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. कोलिम चटणी, कोळंबी लोणचे, कालवांचे लोणचे यांचे प्रात्यक्षिक सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे अपूर्वा सावंत, वर्षा सदावर्ते, डॉ. मनोज घुगुस्कर, नरेंद्र चोगले, तेजस जोशी, प्रशांत पिळणकर आणि सचिन साटम यांनी करून दाखविले. बोंबील चटणी व मत्स्य चकली यांचे प्रात्यक्षिक जलजीविका, रत्नागिरीचे समृद्धी सनगरे, सृष्टी यांनी करून दाखविले. सर्व सहभागींना मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.

















































2.jpg)





























.jpg)
























































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.