loader
Breaking News
Breaking News
Foto

वेळंब येथे अखंड किर्तन महोत्सव व वारकरी प्रशिक्षणाचे आयोजन

वरवेली (गणेश किर्वे) - पारमार्थिक सेवा प्रतिष्ठान पुणे आयोजित अखंड किर्तन महोत्सव व वारकरी प्रशिक्षण प्रतिष्ठानच्या सभासद, साधक व दानशूर भाविकांच्या सहकार्याने दि. २४ एप्रिल ते २६ एप्रिल २०२६ या कालावधीमध्ये महालक्ष्मी मंदिर, बारगोडेवाडी ग्रामस्थ व महिला मंडळ, मु. पो. वेळंब, ता गुहागर येथे आयोजन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दररोज पहाटे ४ ते ६ काकडा आरती, सकाळी ७ वा.पारायण, सकाही ८ वा. अल्पोपहार, सकाळी ९ ते १ किर्तन, दुपारी १ वा. महाप्रसाद, दुपारी ३ ते ६ किर्तन, सायं. ६ ते ७ हरीपाठ, सायं. ७ ते ९ किर्तन, रात्री ९ वा. महाप्रसाद, रात्री १० वा. सांप्रदायीक भजन दि.२४ एप्रिल रोजी ह.भ.प. रीया भुवड, वडद,ह.भ.प. उज्वलाताई पुणे,ह.भ.प. ऋषी माउली आनंदी,ह.भ.प. मनाली धायगुडे,ह.भ.प. भावेश शिंदे,ह.भ.प. छाया चव्हाण वडद यांचे कीर्तन व अभंग होणार आहे. दि.२५ एप्रिल रोजी ह.भ.प. गिरीश पांडे,ह.भ.प. गौरव मुळे,ह.भ.प. आशा कनवडे,ह.भ.प. ज्योती खांडेकर,,ह.भ.प. विजय माळी,ह.भ.प. गायत्री देशमुख यांचे कीर्तन व अभंगहोणार आहे.

टाईम्स स्पेशल

दि. २६ एप्रिल रोजी ह.भ.प. राजश्री पाटकर,ह.भ.प. चंद्रकांत कदम,ह.भ.प. चारुशीला गुल्हाणे,ह.भ.प. वैष्णवी गवळी, ह.भ.प. प्रकाश सोलकर,ह.भ.प. रंगनाथ नाईकडे यांचे कीर्तन व अभंग होणार आहे. या वारकरी प्रशिक्षणामध्ये येणारे विषय: बालसंस्कार, मृदुंग, गायन, पंचनदी, फेटा बांधणे, पारायण इ. शिकवीले जाणार आहे.नाव नोंदणी अनिवार्य, राहणे व भोजन मोफत, प्रवेश निःशुल्क, मृदुग व बालसंस्कार मैगल्या ठिकाणी घेतले जातील. जाणकार शिक्षक वृंद,मृदुग प्रशिक्षणा साठी मृदंग स्वतःचा असावा,गुहागर तालुज्यातील सर्व किर्तनकारांचा सन्मान रात्री ९ वा. करण्यात येणार आहे. संपर्कासाठी ह.भ.प. रीया भुवड, अमोल वनगे, संतोष भुवड, कृष्णा तटकरे मोबाईल.८८८८५६८८७५ येथे संपर्क साधावा.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg