वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतसमोर मच्छीविक्री करण्यासाठी सुसज्ज मार्केट उभारण्यात आले आहे. मात्र तालुक्यातून शृंगारतळी मुख्य बाजारपेठेत मच्छीविक्री करण्यासाठी येणार्या महिला ग्रामपंचायत प्रशासनाचे नियम झुगारून रस्त्यावर बसून विक्री करत आहेत. ग्रामपंचायतने वेळोवेळी सूचना देऊन आणि कारवाई करूनही त्याला न जुमानता दररोज वर्दळीच्या ठिकाणी उघड्यावर मच्छीविक्री करत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली असून ग्रामपंचायतीने तसे पत्र गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांना दिले आहे.
या पत्रात म्हटले आहे की, या बेकायदेशीर मच्छीविक्रेत्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे शिवाय या मच्छीविक्री करणार्या महिलांमुळे पादचारी आणि व्यापारांना मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्यांच्यावर कारवाईसाठी ग्रामपंचायत कर्मचारी गेले होते व संबंधित महिलांना ग्रामपंचायतसमोर असलेल्या मच्छीमार्केटमध्ये जाऊन बसण्याच्या सूचना दिल्या मात्र संबधित महिलांनी तिथे जाण्यास स्पष्ट नकार दिला आणि सार्वजनिक ठिकाणीच मच्छी विक्री सुरु ठेवली आहे. त्या ठिकाणी मासे साफ करून टाकलेली खवले आणि सांडलेल्या घाण पाण्यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरत आहे. ग्रामपंचायतीने वारंवार सूचना देऊन सुद्धा मच्छीविक्री करणार्या महिला ग्रामपंचायत प्रशासनाला जुमानत नसल्याने आपण आपल्या स्तरावर योग्य ती कारवाई करून या महिलांवर गुन्हा दाखल करुन कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायतीने केली आहे.

















































2.jpg)





























.jpg)
























































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.