loader
Breaking News
Breaking News
Foto

चाकरमान्यांच्या जिभेवर रेंगाळतोय जांभळाचा गोडवा!

दापोली (सागर गोवळे) : कोकणची लाल माती आणि तिथला रानमेवा यांचे एक अतूट नाते आहे. सध्या कोकणात रानमेवा बहरण्यास सुरुवात झाली असून, सर्वांच्या जिव्हाळ्याचे आणि औषधी गुणधर्मांनी युक्त असे ’जांभूळ’ आता झाडावर पिकू लागले आहे. एकेकाळी डोंगरदर्‍यात मुबलक प्रमाणात मिळणारे हे फळ आता काही ठराविक ठिकाणीच पाहायला मिळत असले, तरी यावर्षी जांभळाचा गोडवा चाकरमान्यांच्या जिभेवर रेंगाळताना दिसत आहे. काळाच्या ओघात कोकणातील अनेक रानमेव्याच्या जाती, विशेषतः कंदमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. वाढते शहरीकरण, जंगल तोड आणि हवामानातील बदलांमुळे अनेक फळांचे उत्पन्न घटले आहे. मात्र, या सर्व आव्हानांवर मात करत यंदा जांभळाचे पीक काही ठिकाणी चांगलं आले असून, कोकणातील बाजारांमध्ये जांभळाची लगबग ठराविक ठिकाणी पाहायला मिळत आहे. मुंबईत राहणारा चाकरमानी उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी आला की, त्याची पहिली पसंती ही हापूस आंब्यासोबतच जांभूळ, करवंदे आणि काजूला असते. आरोग्यासाठी फायदेशीर जांभूळ हे केवळ चवीलाच नाही, तर मधुमेहासारख्या आजारांवर अत्यंत गुणकारी मानले जाते. तसेच स्थानिकांना रोजगाराची एक संधी उपलब्ध होते. सध्या कोकणच्या बाजारपेठेत जांभळाचा गोड-तुरट स्वाद ग्राहकांना आकर्षित करत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg