रत्नागिरी : ग्रामीण भागातील घराघरांत नळाद्वारे पाणी पोहोचवल्यानंतर आता या योजनांची देखभाल आणि शुद्धता अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, रत्नागिरीसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आता 'जिल्हा तांत्रिक कक्ष'स्थापन करण्यात येणार आहे. यामुळे कोकणच्या भौगोलिक परिस्थितीत राबवल्या जाणाऱ्या पाणीपुरवठा योजना केवळ कागदावर न राहता, त्या तांत्रिकदृष्ट्या अधिक 'स्मार्ट' आणि शाश्वत होणार आहेत.
आतापर्यंत जल जीवन मिशनचा मुख्य भर हा नळ जोडणी आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर होता. मात्र, भविष्यात या योजनांचे व्यावसायिक व्यवस्थापन, नियमित पाणीपुरवठा आणि सुयोग्य तांत्रिक देखभाल सुनिश्चित करण्यावर भर देण्यात येणार आहे. रत्नागिरीसारख्या डोंगराळ आणि विखुरलेल्या वस्त्यांच्या जिल्ह्यात योजना पूर्ण होऊनही तांत्रिक बिघाडामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होण्याच्या तक्रारींना आता पूर्णविराम मिळेल. हा नवनिर्मित तांत्रिक कक्ष जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन आणि ग्रामपंचायती यांच्यातील महत्त्वाचा 'तांत्रिक दुवा' म्हणून काम करेल. या कक्षाची रचना अत्यंत अभ्यासपूर्ण करण्यात आली असून, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता याचे अध्यक्ष असतील. यामध्ये भूवैज्ञानिक, आरोग्य अधिकारी आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापकांचाही समावेश असेल. केवळ समिती स्थापन करून शासन थांबलेले नाही, तर आता पाणीपुरवठ्याचे संपूर्ण ऑडीट 'डिजिटल' पद्धतीने होणार आहे.
या नव्या व्यवस्थेमुळे ग्रामीण भागातील पाणीपट्टी निश्चित करणे, कंत्राटदारांचे पॅनल तयार करणे आणि शुद्ध पाण्याची खात्री करणे सोपे होईल. विशेष म्हणजे, 'सुजलम भारत' डेटाबेसच्या माध्यमातून प्रत्येक योजनेची नोंदणी केली जाईल आणि तक्रार निवारणासाठी 'डिजिटल तिकीट प्रणाली' राबवली जाईल. रत्नागिरीतील दुर्गम वाड्या-पाड्यांवरील पाणीपुरवठ्यात बिघाड झाला, तर त्याचे निवारण किती वेळात झाले, याचे थेट मॉनिटरिंग आता डिजिटल डॅशबोर्डवरून शक्य होईल. ही नवी प्रणाली ग्रामीण जनतेला कायमस्वरूपी आणि शुद्ध पाणी मिळवून देण्यासाठी मैलाचा दगड ठरेल.





















































































































2.jpg)





























.jpg)































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.