मालवण (प्रतिनिधी) - मालवण येथील बॅ.नाथ पै सेवांगणच्या दादासाहेब शिखरे सभागृहात बीट बॉक्सिंग कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. ‘सैय्यारा' हिंदी चित्रपट आणि मित्रां जाहिरातीत झळकलेल्या महाराष्ट्रातील ख्यातनाम बीट बॉक्सर साधना तावडे यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. कार्यशाळेस मालवणमधील विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. सुमेधा नाईक, साने गुरुजी वाचन मंदिराच्या कार्याध्यक्ष डॉ. ज्योती तोरसकर, तसेच सेवांगणचे कोषाध्यक्ष शैलेश खांडाळेकर, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, व्यवस्थापक संजय आचरेकर उपस्थित होते. मान्यवरांचे गुलाब पुष्प व पुस्तक देऊन व्यवस्थापक संजय आचरेकर यांनी स्वागत केले.
साधना तावडे यांनी त्यांचा बीट बॉक्सिंगचा प्रवास, बिट बॉक्सिंगचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करत प्रत्यक्ष सादरीकरणाद्वारे प्रशिक्षण दिले तसेच बीट बॉक्सिंग मधील करिअरविषयी मार्गदर्शन केले. युट्युब व इंस्टाग्राम सारख्या माध्यमांचा योग्य वापर केल्यास यामध्ये उत्तम करिअर घडवता येते. बीट बॉक्सिंग करत राहायचे, नवीन पॅटर्न्स शिकत राहायचे आणि सादर करत राहायचे, तुम्हाला संधी चालून येतील, असे साधना तावडे यांनी सांगितले.
या कार्यशाळेला विद्यार्थी, पालक व कलाप्रेमी यांची मोठी उपस्थिती लाभली. उपस्थितांचे समूह करून प्रत्येक गटाला बीट बॉक्सिंगचे प्रात्यक्षिक करण्यात आले. साधना तावडे यांनी बीट बॉक्सिंगचे सादरीकरण केले. या कार्यशाळेत सुहास ओरोस्कर, उमेश सांगोडकर, वैशाली पंडित, वैशाली शंकरदास, सारिका शिंदे, गौरव सांडव, दादा वेंगुर्लेकर, रिया दळवी, सुभाष कुमठेकर, सुधीर कुर्ले, वैष्णवी आचरेकर, ऋतुजा केळकर, सानिका वायंगणकर, स्वप्नील मिटकर, भारती आचरेकर, मनिषा पारकर, डॉ. राहुल पंतवालावलकर यांच्यासह टोपीवाला हायस्कूलचे विद्यार्थी आणि गीत - संगीत प्रेमींनी सहभाग घेतला.



















































































































2.jpg)





























.jpg)































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.