सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी येथील भूमी अभिलेख कार्यालयातील 'परिक्षण भूमापक' (वर्ग-३) याला १० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. ओमकार सुरेंद्र आपटे (वय ३३) असे या लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव असून, या कारवाईमुळे महसूल विभागाच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारदार यांच्या शेतजमिनीचे 'पोट हिस्सा मोजणी' करण्याचे काम मागील दोन महिन्यांपासून प्रलंबित होते. हे काम पूर्ण करण्यासाठी आरोपी ओमकार आपटे याने तक्रारदाराकडे २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सिंधुदुर्ग यांच्याकडे तक्रार नोंदवली होती.
तक्रारीची दखल घेत एसीबीने सापळा रचला. पडताळणीदरम्यान आरोपी आपटे याने तडजोडीअंती १० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी सापळा यशस्वी करत त्याला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक भागवत गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक विजय पांचाळ, पोलीस निरीक्षक दिपक माळी आणि त्यांच्या पथकातील सुनील सावंत, प्रितम कदम, गोविंद तेली, विजय देसाई, गणेश जगताप, भूषण नाईक, योगेश मुंडे, स्वाती गरुड, उषा आईर व चालक नागेश खोत यांनी केली. कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास, नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक विजय पांचाळ यांनी केले आहे. संपर्क करण्यासाठी टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा ९९२२८९१०६४ या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधता येईल.
















































2.jpg)





























.jpg)























































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.