खेड (दिलीप देवळेकर) - मंडणगड तालुक्यातील बामणघर येथे जमीन खरेदीच्या व्यवहारात ६७ वर्षीय व्यापाऱ्याची तब्बल ४१ लाख ११ हजार ६०० रुपये किमतीची ५२ एकर जमीन हडप केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंबईतील विलेपार्ले येथील रहिवासी असलेले व्यावसायिक महेश रामनिरंजन चामरिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंडणगड पोलिसांनी बाप-लेकावर फसवणूक आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
समिप सुनील दरिपकर आणि सुनील दत्तात्रय दरिपकर (रा. घनसोली, नवी मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील दरिपकर हे फिर्यादी चामरिया यांच्याकडे मागील १५ वर्षांपासून फॅक्टरी मॅनेजर म्हणून कार्यरत होते, तर त्यांचा मुलगा समिप दरिपकर हा मागील ४ वर्षांपासून दापोली परिसरात जमीन खरेदीचे व्यवहार पाहत होता. या विश्वासापोटी चामरिया यांनी समिप याला जमीन खरेदी करण्यासाठी कुळमुखत्यारपत्र (पॉवर ऑफ अॅटर्नी) दिले होते. १४ जुलै २०१४ ते १० जानेवारी २०२५ या प्रदीर्घ कालावधीत, आरोपींनी संगनमत करून चामरिया यांचा विश्वासघात केला. फिर्यादीने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या जमिनी स्वतःच्या नावावर न करता, समिपने अधिकाराचा गैरवापर करत काही जमिनी स्वतःच्या नावे तर काही जमिनी वडील सुनील दरिपकर यांच्या नावे खरेदीखत करून घेतल्या. हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर चामरिया यांनी याबाबत विचारणा केली असता, आरोपींनी त्यांना २५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. ही रक्कम न दिल्यास ठार मारण्याची धमकीही देण्यात आली.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत महेश चामरिया यांनी मंडणगड न्यायालयात धाव घेतली होती. न्यायआदेशानंतर १७ एप्रिल २०२६ रोजी मंडणगड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३-कलम ३१६ (२), ३१८(४), ३३६(३), ३३८ आणि ३५१ (३) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून, जमीन व्यवहारातील या मोठ्या फसवणुकीमुळे परिसरात चर्चांना उधाण आले आहे.




















































































































2.jpg)





























.jpg)































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.